उधार दाढी न केल्याने धाराशिव शहरातील सलून कर्मचाऱ्यावर हल्ला; गंभीर दुखापत

धाराशिव : उधार दाढी कटिंग करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून धाराशिव शहरातील न्यू क्लासिक जेंट्स पार्लर येथे ऋतुराज मोरे या युवकावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ऋतुराज गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ऋतुराज मोरें याने रुग्णालयातून पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तो गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मेन रोडवरील “न्यू क्लासिक जेंट्स पार्लर मध्येकाम करत होता. त्यावेळी बबलू सूर्यवंशी (रा. सावित्रीबाई फुले सोसायटी, धाराशिव) हा दारूच्या नशेत दुकानात आला.
“माझी कटिंग आता कर, मी पैसे देणार नाहीं, उधार कर,” असे तो म्हणाला.

घटनेनंतर दूकानातील लोकांनी ऋतुराजचा मामा आणि दुकान मालक सचिन चौधरी यांना फोन करून माहिती दिली. त्यानी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ऋतुराजला शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी, आरोपी बबलू सूर्यवंशी याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पीडित तरुणाने केली आहे. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला असून, फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी आरोपी बबलू सूर्यवंशी याच्यावर धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१ ) ३५२, ३५१ ( २) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी देखील सलूनचालक सचिन चौधरी यांनी केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या समाजमाध्यमातून व्हायरल होत आहे. ऋतुराज मोरेला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ संबंधित आरोपीविरोधात कारवाई करून दहशत पसरविणाऱ्या वर तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *