नांदेड: सध्या नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील हा जुना व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामध्ये लग्नमंडपाला आग लागल्याने वऱ्हाडी मंडळींची चांगलीचं धावपळ उडालेली पाहायला मिळत आहे. फटाका उडून मंडपाला आग लागली आणि ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कळतंय. याबाबत अधिक माहिती अशी की, हा व्हिडीओ दिवसांपूर्वीचा आहे. आता सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल होतोय . नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील निपाणी सावरगाव येथिल ही घटना आहे.
ताटे कुटुंबियांच्या विवाह सोहळ्यात एकूण तीन लग्नकार्य होते. मोकळ्या मैदानावर मंडप टाकून हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्न लागल्यानंतर फटाके फोडले जात असताना एक फटाका उडून मंडपावर पडल्याने आग लागली. काही क्षणात आग पसरल्याने वऱ्हाडींची धावपळ उडाली. प्रसंगावधान राखत जळणारे मंडप बाजूला काढून उपस्थित वऱ्हाडीनी आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ नांदेड जिल्ह्यात तुफान व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर आले अफवांचे पीक
सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून लग्नातील हौशी मंडळींवर टीकाही केली जात आहे. तर काहींनी हा व्हिडीओ आजचाच असल्याचे ठोकून दिले आहे. लग्न समारंभात अभास निर्माण करण्यासाठी आईस बस्टर, आईस स्पार्कलर आदी प्रकारचे साहित्य सर्रास वापरले जात आहे. त्यात वापरल्या जाणाऱ्या केमिकलचा धूर अनेकाना श्वसनाचे आजार देऊन जात आहेत. तसेच आईस बस्टरसाठी घातक अमोनिया वापरला जात आहे. वरकरणी हे चित्र मनमोहक दिसत असले तरी यातून आरोग्याला बाधा पोहचत आहे.
Leave a Reply