बीड : माजलगावचे माजी आमदार आणि बीड जिल्ह्यातील भाजप नेते आर.टी. देशमुख यांचे सोमवारी संध्याकाळी लातूर जिल्ह्यात एका रस्ते अपघातात निधन झाले. एका पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, लातूर जिल्ह्यातील बेलकुंड गावाजवळील उड्डाणपुलावर दुपारी ४.१५ च्या सुमारास देशमुख तुळजापूर-लातूर रस्त्यावर एसयूव्ही ने प्रवास करत असताना हा अपघात झाला. ते म्ह आले की उड्डाणपुलाच्या सुरुवातीला असताना गाडी रोडवर साचलेल्या पाण्यामुळे स्कीड झाली आणि उलटली. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने कार चालक आणि देशमुख यांना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढले आणि एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात त्यांना गंभीर मार लागला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कार चालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. देशमुख २०१४ ते २०१९ पर्यंत बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून भाजपचे आमदार होते.
मुंडेंचे होते खंदे समर्थक
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहत त्यांनी आजतागायत पंकजा मुंडे यांच्यासाठीच पक्षात काम केले. माजलगाव मतदार संघातून त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या वातावरणात त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. 5 वर्षे त्यांनी माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व केले. अतिशय सोज्वळ, सुसंस्कारी, संयमी आणि खंबीर नेता अशी त्यांची कायमच प्रतिमा परळीसह बीड जिल्ह्यात राहिलेली आहे.
बीड जिल्ह्यातील नेते आणि अपघात
बीड जिल्ह्यातील नेते अपघात हे दुर्दैवी समीकरण झाले आहे. कारण आत्तापर्यंत बीडच्या 4 मोठ्या नेत्यांचा मृत्यू अपघातामुळे झालं आहे. ज्यात सर्वात आदी रेणापूर मतदारसंघाचे आमदार रघुनाथ मुंडे त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, आमदार विनायक मेटे आणि आता आर.टी देशमुख यांचं आशा चार नेत्यांचं अपघातात निधन झालं आहे.
Leave a Reply