बीड:तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या वंजारवाडी येथील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडुन तीन महिलांसह दोन पुरुषांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. मारहाण झालेल्या सर्व जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. वंजारवाडी गावात ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी गावात आणि रस्त्यालगत झाडे लावण्यात आली. यासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. परंतु कुंडलिक तांदळे व त्यांचे कुटुंब हे मेहुण्याचे लग्न असल्याने नेकनूरला गेले होते. त्यामुळे ते यासाठी हजर नव्हते.रात्री वाजता घरी 9 वाजता आल्यावर माजी सरपंच वैजिनाथ तांदळे, त्यांचा मुलगा विशाल तांदळेसह इतर लोक त्यांच्या घरी गेले तुम्ही हजर
नव्हता, त्यामुळे हजार रुपये दंड भरा, असे सांगितले. तांदळे यांनी नकार देताच बाचाबाची करून जमावाने त्यांच्या घरावर दगडफेक केली. शिवाय, घरात घुसूनू लोखंडी रॉड, काठ्यांनी मारहाण केली, असा आरोप तांदळे कुटुंबियानी केला आहे. यात वृद्ध महिलेसह पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या मारहाणीत एका 75 वर्ष वय असणाऱ्या वृद्ध महिलेला देखील मारहाण झाली असून त्यांना पायावर जबर मार लागला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अशी आहेत जखमींची नावे
●कुंडलिक साहेबराव तांदळे (वय ३)
●श्रीराम साहेबराव तांदळे (वय ५५),
●प्रयागा श्रीराम तांदळे (वय ५०)
●संगीता कुंडलिक तांदळे (३9)
● सरस्वती साहेबराव तांदळे (७५)
अशी जखमींची नावे आहेत. यातील कुंडलिक तांदळें हे निवृत्त फौजी आहेत. यात सरस्वती तांदळे यांना बेदम मारहाण
झाल्याने अंगावर व्रण उमटले आहेत तर संगीता यांचा हात मोडला आहे.
सरपंच आणि मुलाचं म्हणणं काय?
भांडण झाले हे सत्य आहे मात्र ते झाड लावण्यावरून झालेले नाही अशी प्रतिक्रिया सरपंच वैजनाथ तांदळे यांनी दिली आहे.करवसुली चालूह होती नलपट्टी भरली नाही, अशा लोकांचे नळ कनेक्शन तोडण्यास ग्रामपंचायतीचे कर्मचारी गेले होते. यावेळी त्यांना दमदाटी करत मारहाण केली. कर्मचारी नवीन असल्याने ते पळून आले. हे सर्व भांडण झाल्यावर आम्ही सगळे गेलो होतो. यावेळी मीच नव्हे तर सर्व गाव उपस्थित होते. आमच्यावरील आरोप खोटे आहेत, माजी सरपंच यांचे पुत्र विशाल तांदळे म्हणाले.
पोलिसांचे म्हणणे काय?
वंजारवाडी गावात दोन गटांत वाद झाला, हे खरे आहे. त्यातील एका गटाचे लोक राजुरी आणि जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेतः त्यांचे जवाब घेणे सुरू असून, त्यानंतरच खरे कारण
समोर येईल. सध्या तरी झाडे लावण्यावरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु अधिकृत माहिती नाही.गुन्हा दाखल होताच कारवाई करू.
असं बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाळराजे दराडे म्हणाले.
Leave a Reply