टपरी ते विधानसभा उपाध्यक्ष ; अण्णा बनसोडे यांचा प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या पदासाठी केवळ महायुतीकडूनच त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता, जो आज दुपारी वैध ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा प्रस्ताव मांडला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला अनुमोदन दिले.

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी तीन नावे चर्चेत होती लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे, तसेच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावं चर्चेत होती. मात्र, अखेर अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. अण्णा बनसोडे अजित दादा समर्थक आमदार आहेत. त्याचबरोबर पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

कोण आहेत अण्णा बनसोडे?

अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जातात. 2009 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले बनसोडे 2014 मध्ये पराभूत झाले, मात्र 2019 आणि 2024 मध्ये पुन्हा विजयी झाले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही ते अजित पवार गटासोबत ठाम राहिले.

अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास:

– जन्म – ४ मे १९६८

– शिक्षण – उच्च माध्यमिक शिक्षण (HSC), औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)

– पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

– मतदार संघ – २०६ पिंपरी (अनुसूचित जाती, राखीव)

– राजकीय कारकिर्द – 1997 आणि 2002 सलग दोन वेळा नगरसेवक

– दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष पद ही भूषवलं

– २००९ ला पहिल्यांदा आमदार म्हणून निवड

– २०१४ ला पराभव

– पुन्हा २०१९ आणि २०२४ सलग दोन वेळा आमदार म्हणून विजय.

– आमदारकीची तिसरी टर्म

– अजित पवार यांच्या प्रत्येक बंडात पाठिंबा. निष्ठावान म्हणून ओळख.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *