गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांच्या दहशतीला कंटाळून पेनगुंडा गावकऱ्यांनी नुकतीच नक्षलवाद्यांना गाव बंदी केली होती. अति-दुर्गम पेनगुंडा आणि आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागावा, तसंच त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी पोलीस मदत केंद्र उभारणं गरजेचं होतं. हे लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी लगेच नक्षल कारवायांवर अंकुश निर्माण करण्यासाठी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम पेंनगुंडा याठिकाणी केवळ २४ तासात नव्या पोलीस मदत केंद्राची निर्मिती केली. 24 तासात उभारले मदत केंद्र : पेनगुंडा पोलीस मदत केंद्र निर्माण कार्यात 1000 सी–60 कमांडो, 25 भुसुरुंगविरोधी पथके, 100 नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी आणि खाजगी कंत्राटदार यांनी मदत केली.
Please follow and like us:
Leave a Reply