देवाभाऊ, मला कुठं तरी राज्यपाल तरी करा’ नाहीतर बँडवाल्यासारखी अवस्था होईल’ : सदाभाऊ खोत

आमदार सदाभाऊ खोत यांनी विनोदाने का होईना पण आपली खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, ‘देवाभाऊ, मला कुठंतरी राज्यपाल करा, नाहीतर बँडवाल्यासारखी अवस्था होईल, अशी खंत सदाभाऊ खोत यांनी सांगलीतील विटा येथील कार्यक्रमात बोलून दाखवली. त्यांच्या या विधानाची भरपूर चर्चा होत आहे. याआधी युती सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री पद भूषवले आहे.

 

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

आमदार गोपीचंद पडळकर यांचा विटा येथे नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे खासदार आणि गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील असे सांगत आपल्याला किमान राज्यपाल तरी करा अशी मिश्कील भावना व्यक्त केली. त्यामुळे व्यासपीठावर आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष जर कोणी केला असेल तर ते गोपीचंद पडळकर आहेत. गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरनारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे. कारण योद्धा रणांगणात हरत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो, असं खोत म्हणाले.

 

आम्ही ज्यांना नेता म्हणलं ते आमचे देवाभाऊ गोपीचंद पडळकर यांना एक दिवस मंत्री केल्याशिवाय थांबणार नाहीत. तो पर्यंत कोणीही कितीही देव पाण्यात घालू द्या काही उपयोग होणार नाही. मी सुद्धा लोकसभेला निवडणुकीत उभा राहणार आहे. पण आम्हाला नेहमी एक भीती वाटते. ती म्हणजे अडनावाची, असं देखील सदाभाऊ म्हणाले. पृथ्वीराज देशमुख हे आमदार होतील खासदार होतील. गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील पण मला कुठं तरी राज्यपाल तरी करा. नाही तर आमंद बॅड वाल्यासारखं व्हायचं. बॅडवाल्याचं कसं असतं चांगलं गाणं वाजवायला लागलं की शेजारी असणारे सर्व म्हणतात की पुन्हा एकदा होऊन जाऊदे. तशी आमची अवस्था झाली आहे. सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र हास्यकल्लोळ झाला.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *