लग्नाचं आमिष दाखवून तरुणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. अशाच प्रकारच्या दोन घटना नारपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्या आहेत. बलात्कारप्रकरणी भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांनी दिली आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शशी मारू आणि महेश गणेश शेलार अशी फरार आरोपींचे नाव आहेत.
पहिल्या घटनेत 21 वर्षीय तरुणी ही मुंबई शहरातील गोवंडी भागात कुटुंबासह राहते. त्यातच तिचं आरोपी शशी याच्याशी प्रेमाचं सूत जुळलं. त्यानंतर पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून शशी मारू याने पीडित तरुणीच्या इच्छेविरुद्ध भिवंडीतील एका लॉजमध्ये जून 2024 मध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मात्र पीडितेला दगाबाजानं लग्नास नकार दिला, असं पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी 23 एप्रिल रोजी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत 19 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे. ती अल्पवीयन असतानाच तिचं रायगड इथल्या महेश गणेश शेलार या तरुणासोबत प्रेमाचं सूत जुळलं होतं. त्यानंतर आरोपीनं लग्नाच्या आमिषानं पीडितेच्या बाल मनाचा फायदा घेऊन तिच्यावर भिवंडीतील लॉजमध्ये जून 2023 ते 21 एप्रिल 2024 पर्यंत वारंवार अत्याचार केला. खळबळजनक बाब म्हणजे आरोपी महेशनं त्याच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पीडित तरुणीसोबतचे फोटो अपलोड करून तिचं लग्न दुसरीकडं होवू देणार नाही, अशी धमकी देवून पीडितेची बदनामी केली, अशी तक्रार पीडितेने दिली आहे.
Leave a Reply