नवी दिल्ली: ‘इंडिया’ आघाडीने सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यावर विचार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत, ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी मतदारांच्या भूमीवरील प्रश्नांवर निवडणूक आयोगाने दिलेली उत्तरे आणि आयोगाच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा केली. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत विरोकाऱ्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर दिली नाहीत, यावर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.काही खासदारांनी हा मुद्दा अधिक गांभीर्याने घेऊन थेट महाभियोग प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. आयोगाने प्रश्नांची उत्तरे न दिल्याने ही लढाई सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने रविवारी पत्रकार परिषद घेत मत चोरीचे आरोप फेटाळले होते आणि विरोधांचे आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. यावर, बैठकीत सखोल चर्चा झाली. काँग्रेस नेते नशीर हुसेन यांनी सांगितले की, आयोग सध्या भाजप प्रशासनाकडे काम करत आहे. देशांना निष्पक्ष मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाची गरज आहे. गरज पडल्यास, संसदीय लोकशाहीमध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही प्रक्रियेचा वापर करण्यास आम्ही तयार आहोत. संसद अधिवेशनादरम्यान, काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सभा, टीडीपी व इंडियाच्या खासदारांनी बहरील निवडणूक आयुक्तांविरोधात निवदने केली. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारावरही चर्चा झाली.
Leave a Reply