अखेर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं असून पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. अखेर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. याबाबत भारतीय सरकारने निवेदन जारी करत माहिती दिली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली. इतकंच नाही तर ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती भारत सरकारकडून निवेदनाद्वारे देण्यात आलीय.
जम्मूच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत-पाकमधील सबंध आणखी तणावपूर्ण झाले होते. अखेर भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले करत एकप्रकारे पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. या हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.भारताच्या हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले की, पाकिस्तानला प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानवर 24 क्षेपणास्त्रे डागली आहेत.
शाहबाज शरीफ यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून म्हटलं आहे की, “शत्रूने पाकिस्तानच्या पाच ठिकाणांवर भ्याड हल्ला केला आहे. भारताच्या या हल्ल्याला ‘अॅक्ट ऑफ वॉर'(युद्धाची कृती) असं म्हटलं जाईल.” शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे, “भारताच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे. आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत.” मात्र एकूणच भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या हल्ल्यात कितीजण मृत्युमुखी पडलेत याचा अधिकृत आकडा अजून बाहेर आलेला नाही. मात्र काही माध्यमातून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर हवाई हल्ल्यात 30 जण ठार झाले आहेत. त्यात जैश-ए -लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
Leave a Reply