नवी दिल्ली – काँग्रेस-राजद आघाडीच्या व्यासपीठावरून त्यांच्या आईविषयी करण्यात आलेल्या अवमानासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. “माझ्या आईला शिवीगाळ करणे हा फक्त माझ्या आईचाच नाही, तर देशातील प्रत्येक मातांचा अपमान आहे,” असे मोदी म्हणाले. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत बोलताना मोदी म्हणाले की, त्यांच्या आईने अत्यंत साधेपणात आयुष्य व्यतीत केले. कठीण प्रसंग, आजारपण आणि दारिद्र्य यांचा सामना करत त्यांनी मुलाला योग्य संस्कार दिले. “आईने मला राजकारणासाठी कधीही प्रवृत्त केले नाही, पण माणुसकी, सत्य आणि प्रामाणिकतेचे धडे दिले. त्यांचे शंभर वर्षांचे आयुष्य हे त्यागमय होते,” असे ते म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले, “आईच्या संदर्भात अशा प्रकारे बोलले गेले, तेव्हा माझ्या मनाला फार दुःख झाले. यामुळे मी देशसेवेत अजून जोमाने झोकून देण्याचा निर्धार केला आहे. माझ्यासाठी आई म्हणजेच देश आहे. आईचे स्थान कोणी घेऊ शकत नाही.” दरम्यान, मोदींच्या या वक्तव्याने सभेत मोठ्या प्रमाणावर टाळ्यांचा कडकडाट झाला. काँग्रेस-राजद आघाडीवर हल्लाबोल करताना त्यांनी आईच्या प्रतीहल्ल्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असून हा मुद्दा राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Leave a Reply