वाढवण बंदरासाठी ५,७०० कोटींचा करार ; पायाभूत सुविधांच्या कामांना गती

महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराच्या विकासासाठी मोठा टप्पा गाठण्यात आला असून, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत तब्बल ₹५,७०० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री, ‘एमओएसपीडब्ल्यू’ शंतनू ठाकूर, ‘जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण’ (जेएनपीए)चे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ आणि ‘एमओपीएसडब्ल्यू’चे इतर मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
.हा करार केवळ पालघर जिल्ह्याच्या नव्या औद्योगिक शक्यता उघडणारा नसून, पश्चिम किनारपट्टीच्या अर्थव्यवस्थेला देखील बळकटी देणारा ठरणार आहे.

सामंजस्य करारांवर स्वाक्षरीनंतर केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपल्या भाषणात वाढवण बंदराच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केलं.ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराला जगातील सर्वोच्च दहा बंदरांपैकी एक बनवण्याचं स्वप्न पाहिलं आहे. या प्रकल्पामुळे भारताची सागरी वाहतूक आणि बंदर हाताळण्याची क्षमता तब्बल तिप्पट होण्याची अपेक्षा आहे.”

२०४७ सालापर्यंत ‘विकसित भारत’ बनण्याच्या दिशेने एक पाऊल

वाढवण बंदर हे केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण प्रादेशिक व्यापारासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. हे ग्रीनफिल्ड आणि डीप ड्राफ्ट सुविधांनी सज्ज बंदर सर्व प्रकारच्या हवामानात कार्यक्षम राहणार असून, भविष्यातील मोठ्या मालवाहतूक क्षमतेला हाताळण्यासाठी आदर्श ठरणार आहे.भारताने 2047 पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ होण्याचं स्वप्न उराशी बाळगले असताना, वाढवण बंदर त्या दिशेने एक महत्त्वाचं विकासकेंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.या संदर्भात स्वाक्षरी केलेले सामंजस्य करार वाढवण बंदराच्या पायाभूत सुविधा आणि क्षमता वाढवण्यास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलण्यास मदत करतात.वाढवण बंदरासाठी करण्यात आलेल्या ५ हजार, ७०० कोटी रुपयांच्या एकूण पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी ४ हजार, २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे कंटेनर, बल्क आणि लिक्विड कार्गो हाताळण्यासाठी टर्मिनल विकसित करणे, एक हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे बल्क आणि लिक्विड कार्गो हाताळण्यासाठी टर्मिनल विकसित करणे आणि ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे द्रवरूप रसायने व संबंधित उत्पादने हाताळण्यासाठी तीन लाख सीबीएम क्षमतेचे द्रवरूप कार्गो जेट्टी आणि टँक फार्म विकसित करणे, या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *