ढाका विद्यापीठातील (डीयू) विजयाच्या काही दिवसांनंतर इस्लामी संघटना जामाते-इस्लामीने जाहंगिरनगर विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकांवर झेंडा फडकावला आहे. इस्लामी छात्र शिबिर , जी जामाते-इस्लामीची विद्यार्थी शाखा आहे, हिने शनिवारी झालेल्या केंद्रीय विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांत २५ पैकी तब्बल २० जागांवर विजय मिळवला. विशेष म्हणजे मागील ३५ वर्षांपासून या संघटनेवर कॅम्पस बंदी होती. अलीकडेच झालेल्या ढाका विद्यापीठाच्या केंद्रीय विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांतही आयसीएस ने १२ पैकी ९ जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व पुन्हा सिद्ध केले होते. त्यामुळे बांगलादेशातील प्रमुख शैक्षणिक केंद्रांवर इस्लामी विचारसरणीचा प्रभाव झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
या निवडणुकांत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या विद्यार्थी शाखेला एकही जागा मिळाली नाही. डीयुसीएसयु निवडणुकांत त्यांनी बहिष्कार पत्करला होता. दुसरीकडे, देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेश अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेला – बांगलादेश छात्र लीगला आंतरिम सरकारने दहशतवादी संघटना ठरवून निवडणुका लढवण्यास मज्जाव केला. त्याशिवाय अवामी लीगलाही दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत निवडणुकांपासून दूर ठेवण्यात आले आहे.
आंतरिम नेते नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या कारभाराखालील या बदलत्या राजकीय समीकरणाकडे तज्ज्ञ “धार्मिक अतिरेकी विचारसरणीच्या वाढीचे सूचक” म्हणून पाहत आहेत. विद्यापीठांमध्ये दीर्घकाळ बंदी घातलेल्या संघटनांना पुन्हा लोकसमर्थन मिळणे ही बांगलादेशी राजकारणातील धोकादायक घडामोड असल्याचे स्पष्ट होत आहे.
–
Leave a Reply