कासारगोड (केरळ) भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या सन्मानार्थ केरळमधील कासारगोड येथे एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी गावस्कर शुक्रवारी कासारगोड येथे उपस्थित होते.
भारत विरुद्ध बांगलादेश आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सामना झाल्यानंतर गुरुवारी रात्री गावस्कर भारतात परतले. त्यानंतर शुक्रवारी कासारगोडमध्ये त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याच्या उद्घाटन समारंभात त्यांनी हजेरी लावली.या निमित्ताने गावस्कर म्हणाले, “माझ्यासाठी हा खरोखरच अभिमानास्पद क्षण आहे.” संपूर्ण कासारगोडमध्ये या कार्यक्रमाच्या तयारीसाठी फलक आणि पोस्टर्स लावण्यात आले होते. म्युनिसिपल स्टेडियममध्ये हा समारंभ पार पडला.
रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बहुचर्चित सामन्यासाठी गावस्कर पुन्हा दुबईला रवाना होणार आहेत. याआधी इंग्लंड, अमेरिका आणि आफ्रिकेतील क्रिकेट मैदानांवरही गावस्कर यांच्या नावाचा सन्मान करण्यात आला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील “सुनील गावस्कर पॅव्हेलियन” हा क्रिकेटप्रेमींमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. तसेच, भारताच्या या दिग्गज क्रिकेटपटूसाठी वानखेडे स्टेडियममध्ये एक खास हॉस्पिटॅलिटी बॉक्स उपलब्ध करून देण्यात आला आहे, जिथे त्यांचे कुटुंब आणि मित्र क्रिकेट सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

केरळमधील रस्त्याला मराठमोळ्या सुनिल गावस्करांचे नाव
•
Please follow and like us:
Leave a Reply