कोल्हापूर – महाराष्ट्र दिनमान’कडून कोल्हापुरात ‘अभिजात मराठी गौरवार्थ’ दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात हे साहित्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. डी. वाय. पाटील समूह, कोल्हापूर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम २४ आणि २५ ऑगस्ट रोजी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. या साहित्य उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘शंकर पाटील जन्मशताब्दी विशेष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत रामदास फुटाणे यांची मुलाखत. त्यांच्यासोबतच पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘गाभ’ चे दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप
२५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या उद्घाटन समारंभाला प्रख्यात हिंदी कवियत्री गगन गिल, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, आमदार सतेज पाटील, हिंदी कवी आणि गीतकार डॉ. बोधिसत्व आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांची उपस्थिती असणार आहे. उद्घाटन सत्रानंतर, ‘दिनमान’चे संपादक विजय चोरमारे हे गगन गिल यांची तर टिकम शेखावत हे बोधिसत्व यांची मुलाखत घेतील. त्यानंतर, दुपारच्या सत्रात अभिनेत्री गिरीजा ओक यांची मुलाखत पत्रकार सौमित्र पोटे घेणार आहेत.
‘पुस्तकाच्या अंतरंगात’ आणि काव्य मैफिल
‘पुस्तकाच्या अंतरंगात’ या विशेष सत्रात ज्येष्ठ पत्रकार आणि ‘मणिपूर समजून घेताना’ या पुस्तकाचे लेखक शाहू पाटोळे आणि धनंजय बीजले यांची मुलाखत डॉ. अशोक जत्राटकर घेतील. दुपारी ४ ते ५ या वेळेत एक काव्य मैफिल रंगणार आहे. यामध्ये सौमित्र, किशोर कदम, अरुण म्हात्रे, आभा, मोनिका सिंग, संदीप माळवी, सुमित लांडे, मिलिंद शिंदे, प्रशांत मोरे, प्रशांत होळकर, संजीवनी तडेगावकर आणि अपूर्व राजपूत यांसारखे कवी आपली कविता सादर करतील. हा साहित्य उत्सव साहित्यिक आणि वाचकांसाठी एक मोठी पर्वणी ठरेल अशी अपेक्षा आहे.
Leave a Reply