सोलापूर: सोलापूर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांमध्ये ‘लम्पी’ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजारामुळे आत्तापर्यंत ३३ जनावरांचा मृत्यू झाला असून, ४०३ जनावरे या आजाराने ग्रस्त आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लम्पी हा त्वचेशी संबंधित आजार असून, त्याचा सर्वाधिक फैलाव माळशिरस तालुक्यात झाला आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये एकूण ६८५ जनावरांना या आजाराची लागण झाली होती. त्यापैकी ५४२ जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत, ११ जनावरे दगावली असून १३२ जनावरांवर अजूनही उपचार सुरू आहेत. करमाळा तालुक्यात १७५ जनावरांना या आजाराची लागण झाली होती, त्यापैकी १२५ जनावरे बरी झाली आहेत, १० जनावरे मृत्युमुखी पडली असून ४० जनावरे अद्यापही बाधित आहेत. मंगळवेढा तालुक्यात १४७ बाधित जनावरांपैकी ७ जनावरांचा मृत्यू झाला असून, ८७ जनावरे बरी झाली आहेत आणि ५३ जनावरांवर उपचार सुरू आहेत. पंढरपूर तालुक्यात ३५२ जनावरांना संशयित म्हणून गणले गेले, त्यापैकी २८४ जनावरे बरी झाली आहेत आणि ६८ जनावरे बाधित आहेत. लम्पीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाकडून यावर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
Leave a Reply