मुंबई: महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाने जागतिक स्तरावर कौतुकास पात्र ठरले आहे. ‘मार्जिन स्टॅनले’ या नामांकित जागतिक वित्तीय सेवा संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक लाख कोटी डॉलर्स (एक ट्रिलियन डॉलर) पर्यंत पोहोचेल. अर्थव्यवस्थांवरील वाढलेला विश्वास, देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणुकीतील वाढ यामुळे राज्याने आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, ज्यामुळे गुंतवणुकीतही वाढ झाली आहे.
राज्याच्या प्रगतीचे कारणे
‘मार्जिन स्टॅनले’ च्या अहवालानुसार, महाराष्ट्राचा उच्च साक्षरता दर, उत्तम शिक्षण व्यवस्था, मोठ्या प्रमाणावर होणारी देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणूक तसेच स्थिर आर्थिक विकास यामुळे राज्याने ही प्रगती साधली आहे. गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्रात झालेल्या सुधारणा, सेवा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे, आणि वाढत्या औद्योगिकरणाने राज्याच्या विकासाला गती दिली आहे. धातू वाटप, अन्नप्रक्रिया, पेट्रोलियम आणि यंत्रसामग्री उत्पादन यांसारख्या उद्योगांमधील गुंतवणुकीत वाढ झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र – लिडींग द वे’ या शीर्षकाखाली हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून महत्त्व
अहवालात नमूद केल्यानुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १५.५ टक्के वीज वापर आणि १,९८० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. कृषी आणि औद्योगिक उत्पादनातही राज्याने देशातील एकूण उत्पादनाच्या १५ टक्के मोठा वाटा उचलला आहे. सातत्याने होणारी निर्मिती आणि सुधारणा यामुळे उत्पादनातील महाराष्ट्राचा वाटा २० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, ज्यामुळे महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनले आहे.
जागतिक स्तरावरील तुलना
सध्या महाराष्ट्राचा एकूण जीडीपी ५३६ अब्ज डॉलर असून, तो जगातील २२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या फिनलँडच्या जीडीपीच्या बरोबरीचा असल्याचे अहवालात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला दुजोरा
महाराष्ट्राने भारतीय गुंतवणुकीत देशात अग्रस्थान मिळवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत होते, ज्याला आता ‘मार्जिन स्टॅनले’ च्या अहवालाने दुजोरा दिला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी २७ टक्के गुंतवणूक केवळ महाराष्ट्रात झाल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये असलेले अव्वल स्थानही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
प्रमुख प्रकल्पांचा आर्थिक परिणाम
मुंबईतील शंभर लोक वसाहती, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वांद्रे-वरळी सी-लिंक, समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे. सक्षम नेतृत्वाखालील या घडामोडींमुळे गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
Leave a Reply