गेल्या अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी साहित्य क्षेत्राला नवीन उभारी मिळाली आहे. त्यात दुग्धशर्करा योग साधत राज्य मंत्रिमंडळाने “महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोड”च्या मागील आठ वर्षांची भूखंड मागणीचा प्रस्ताव मंजूर केला. “मराठीच्या संवर्धनासाठी भाषा संशोधन केंद्र स्थापण्याचा मानस आहे” असे शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालून, मंजुरीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी अधिकाराने सोडवल्या. त्यांच्या सकारात्मक दृष्टिमुळे मंजुरी मिळाली. “भाषा संशोधन केंद्र स्थापण्याचा मान नाशिकला दिल्याचे समाधान मिळाले” असे फडणवीस म्हणाले.
गायधनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक वेळा भेटून मागणी मांडत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आत्मीयतेने, शब्द टाकून प्रस्ताव मंजुरीस चालना दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार दिलीप बनकर यांनी तत्परतेने शिफारस केली. दादा भुसे यांनी खऱ्या अर्थाने पालकत्व स्वीकारून पाठपुरावा केला. त्यास शंभूराज देसाई, गिरीश महाजन आणि हेमंत गोडसे यांनी सहकार्य केले.
अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. इकबाल सिंह चहल आणि विकास खारगे यांनी प्रशासकीय अडचणी सोडविल्या. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे व अंबादास जोशी आणि पूर्व धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे यांनी मार्गदर्शन केले. नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव ई. असीम कुमार गुप्ता, प्रशांत पवार, शैलेंद्र तनपुरे याचे विशेष सहकार्य लाभले.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर झाल्यावर उन्मेष गायधनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या “गेल्या सात आठ वर्षात दीडशे पावणेदोनशे चकरा माराव्या लागल्या. शाखेतील सहकारी उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, शिवाजी म्हस्के, रेखा पाटील, प्रा. शरद मोरे, हर्षल भामरे, डॉ. राहुल बोराडे यांनी प्रचंड मेहनत घेतली. पदरमोड करून साहित्य सेवेचे कार्य केल्याचे भाग्य लाभले”.
तत्कालीन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहसचिव सतीश जोंधळे, नगररचना संचालक प्रतिभा भदाणे, सहसचिव सुबराव शिंदे, राम साबणे आदींनी चालना दिली.
शाखेचे कार्यवाह रवींद्र मालुंजकर, कोषाध्यक्ष ॲड. सुदाम सातभाई, जिल्हा प्रतिनिधी ॲड. नितीन ठाकरे, दशरथ लोखंडे, वृंदा देशमुख, सुरेखा गणोरे, मिलिंद घमंडी, सुमन हिरे, रामचंद्र शिंदे आदींनी अभिनंदन केले.
Leave a Reply