आज जागा वाटपाच्या भांडणात अडकलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे “आकडे” ठाऊक आहेत का ?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले हे खरे असले, तरी त्यांची आघाडी अत्यंत कमी मतांच्या बळावर मिळालेली होती.
हे “लोकनिती” च्या सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे, की बहुतांश मुस्लिम, बौद्ध आणि आदिवासी मतदार हा महाविकास आघाडीच्या सोबत आहे. तर मराठे आणि इतर मागासवर्गीय मतदार सत्ताधारी महायुतीच्या पाठीशी उभे असलेले दिसतात… वास्तविकपणे आजवरचा इतिहास पहत्त, ओबीसी आणि मराठा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य आधार होता. पण सेक्युलर अजेंड्यावर जास्त भर दिल्यामुळे लोकसभा निवडणुकीत हा वर्ग महाविकास आघाडी कडून महायुतीकडे सरकत गेला. आणि लोकसभा निवडणुकीत यशाचा जल्लोष साजरा करण्यात जसजसा काळ गेला, तसतसा हा वर्ग अधिक प्रमाणात महायुतीच्या, खास करून अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जवळ जाताना दिसला.
काहींनी भाजपाला पहिली पसंती दिली. ही वस्तुस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकीय स्थिती आणखी बदललेली असेल. आज मराठवाडा आणि विदर्भात मराठा आरक्षण आंदोलनामुळे आणि जरांगे पाटील यांनी सर्व २८८ जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे, आधीच काँग्रेस , राष्ट्रवादीचे मराठा आमदार परेशान झालेले आहेत. त्यांना काय करावे हे समजत नाही. महाविकास आघाडीने आजवर मराठा आरक्षणासंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. परिणामी सखोल अभ्यासातून पुढे आलेले हे “आकडे” या काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या आमदारांना, आमदार होऊ इच्छिणाऱ्यांना आणखीन गोंधळात पाडतील. पक्ष सोडून वेगळा विचार करायला भाग पाडतील असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
महेश म्हात्रे
संपादक आणि संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर
Leave a Reply