मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : ‘चॅलेंजर किंग’ने चालवला जागतिक सायबर गुन्हेगारीचा आर्थिक जाळं, ईडीच्या तपासातून उघड

मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील फरार आरोपी आणि कथित मास्टरमाइंड मेहमूद भगत उर्फ ‘चॅलेंजर किंग’ याने अवैध आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी भूमिका बजावल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासातून उघड झाले आहे. भगतने खंडणी, ऑनलाइन गेमिंग, बेकायदेशीर सट्टा, फॉरेक्स ट्रेडिंग, डिजिटल फसवणूक आणि विविध सायबर गुन्ह्यांमधून मिळणारे उत्पन्न अनेक देशांमध्ये पोहोचवण्यात भागदची भूमिका महत्त्वाची होती. या अवैध पैशांचा व्यवहार विविध देशांमध्ये करण्याचे काम भगतने केले.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भगत हा सायबर गुन्हेगारीतील ‘मिडलमॅन’ होता, जो अवैध पैशांचा प्रवाह परदेशी बँक खात्यांमध्ये आणि देशातील बेकायदेशीर वित्तीय जाळ्यात सहजतेने घडवत होता. भगतने अनेक क्लिष्ट आर्थिक मार्गाद्वारे काळ्या पैशाचा स्रोत लपवलाआणि त्याची गुंतागुंत परदेशी नेटवर्कद्वारे तयार केली, ज्यामुळे त्या पैशांचा मागोवा घेणे जवळपास अशक्य झाले. तपासानुसार, भगत अनेक गुन्हेगारी टोळ्यांशी थेट संबंधित होता आणि त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर अवैध पैशांचा प्रवाह घडवत होता. त्याने फसवणूक करून मिळवलेले पैसे शेल कंपन्या, बनावट बँक खाती, खोट्या ओळखीतून चालवलेल्या व्यवसायांद्वारे परदेशात पाठवले. त्यासाठी त्याने ‘म्युल अकाउंट्स’, बनावट सॉफ्टवेअर कंपन्या आणि परदेशातील व्यावसायिक घटकांचा वापर केला. याशिवाय, भगतच्या नेटवर्कमध्ये ‘एंट्री ऑपरेटर्स’ नावाचे आर्थिक तज्ज्ञ होते, जे पैशांचे व्यवस्थापन करत होते. त्यांनी पैसे देश-विदेशात शटल केले आणि अवैध पैसे पांढरे करून वैध मालमत्तेत रूपांतरित केले. तपासात असेही उघड झाले आहे की, भगतने सट्टा, गेमिंग, ऑनलाइन फसवणूक, फॉरेक्स ट्रेडिंग यासारख्या गुन्हेगारी माध्यमांद्वारे कोट्यवधी रुपये कमावले होते. त्याचे अवैध व्यवहार विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय क्षेत्रांमध्ये पसरले होते. ईडीच्या तपासात हेही समोर आले की, भगतने डिजिटल वॉलेट्स आणि परदेशी बँक खात्यांद्वारे अवैध पैशांची वाहतूक केली. यामुळे पैसे सहजपणे एका देशातून दुसऱ्या देशात पाठवता येत होते, तर मूळ स्रोत लपवता येत होता. तपासात एक मोठा खुलासा झाला, जेव्हा भगतच्या पाच जवळच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. यात सिराज अहमद मोहम्मद हारून मेमन, नागनी अकरम मोहम्मद शफी (उर्फ मोनू), वसीम वली मोमद भेसानिया (उर्फ संजू), शरीफ मिया आमिरमिया शेख आणि मोहसिन अहमद खिलजी यांचा समावेश होता. हे सर्वजण भगतच्या अवैध आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करत होते. या टोळीने बोगस कृषी उत्पन्न बाजार समित्या तयार करून त्याद्वारे पैसे वळवले. संशयितांनी रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS)आणि बँकिंग चॅनल्सद्वारे पैसे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बनावट कंपन्यांमध्ये वळवले आणि मोठ्या प्रमाणात रोकड काढून घेतली. या व्यवहारांना कृषी व्यापाराचा आडोसा देऊन काळा पैसा अधिकृत व्यवहारांमध्ये मिसळण्यात आला.

या बनावट व्यवहारांद्वारे १९८ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वळवण्यात आल्याचा अंदाज ईडीने व्यक्त केला आहे. हे पैसे हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून परदेशात पाठवले गेले.याशिवाय, भगतने अनेक शेल कंपन्या तयार करून त्याद्वारे बँक व्यवहार केले. काळा पैसा पांढरा करण्यासाठी ‘क्रिप्टोकरन्सी’ आणि ‘USDT’ चा वापर केला गेला. त्याचबरोबर भारतात आणि परदेशात हवाला व्यवहारांचे जाळेही उभारले होते.

तपासात हेही समोर आले आहे की, भगतने रिअल इस्टेट गुंतवणूक आणि काही शेल कंपन्यांचा वापर करून अवैध संपत्तीची गुंतवणूक केली. काही सार्वजनिक ट्रस्ट्सवरही संशय व्यक्त केला जात आहे. तपासादरम्यान, भगतने सोशल मीडियावर एन्क्रिप्टेड व्हॉइस नोट्सच्या माध्यमातून आपले आदेश दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये व्हॉट्सअॅपचा देखील वापर करण्यात आला.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *