हिंदू मटण विक्रेत्यांसाठी मल्हार सर्टिफिकेट; नितेश राणेंचं नवं धोरण

मुंबई : राज्यात नितेश राणे मंत्री झाल्यापासून अनेकदा मुस्लिम समाजाला लक्ष करत आले आहेत. अनेकदा त्यांनी मुस्लिम समाजावर टीका देखील केली आहे. त्यांची हीच वक्तव्य समाजात दुही निर्माण करणारी असल्याची टीका विरोधक करतात. आता तर त्यांनी हलाल विरूद्ध झटका अशा वादाला हवा देणारा फतवा काढत हिंदूंसाठी मल्हार सर्टिफिकेशन आणल्याचे सांगितले आहे. तर ज्या मटण दुकानात मल्हार सर्टिफिकेशन असेल त्याच दुकानातून मटन खरेदी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

यामुळे हलाल आणि झटका वाद आता लोकांना तटापर्यंत पोहचणार असून ते चांगले आहे की नाही यापेक्षा तो कोण कापतो यावरून ठरवले जाणार आहे. नितेश राणे यांनी सांगितलं की‘मल्हार सर्टिफिकेशन’असलेल्या मटन दुकानातूनच मटण खरेदी करावं, असे आवाहन त्यांनी हिंदू समाजाला केलं आहे. यामुळे हलाल आणि झटका मांस याविषयी वाद पेटला आहे.

राणे म्हणाले; आम्ही मटणाच्या दुकानांना मल्हार झटका प्रमाणपत्र देणार आहोत. याठिकाणी फक्त झटका मांस विकले जाईल. यासाठी आम्ही मल्हार सर्टिफिकेशन नावाची व्यवस्था तयार केली आहे. या सर्टिफिकेशनच्या माध्यमातून दुकानांची नोंदणी होईल आणि हिंदू समाजाला त्यांच्या गरजेनुसार मटणाच्या दुकानांची सुविधा उपलब्ध होईल. या दुकानांमध्ये १०० टक्के हिंदूंचा प्राबल्य असेल आणि विक्रेतेही हिंदू असतील.

नितेश राणे यांनी हिंदू समुदायाला आवाहन केला की, ते फक्त मल्हार प्रमाणपत्र असलेल्या मटन दुकानांवरच मटण खरेदी करावं, ज्यामुळे ‘झटका मांस’ विक्रीला प्रोत्साहन मिळेल. यामुळे हलाल आणि झटका वाद आता लोकांना तटापर्यंत पोहचणार असून ते चांगले आहे की नाही यापेक्षा तो कोण कापतो यावरून ठरवले जाणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *