मानवी मेटाप्न्युमोव्हायरस (Human Metapneumovirus – HMPV) हा एक विषाणू आहे, जो प्रामुख्याने सर्दीसारखी लक्षणे निर्माण करतो. या विषाणूमुळे खोकला, नाक वाहणे, घसा खवखवणे किंवा दमा यांसारख्या श्वसनविकारांना तोंड द्यावे लागते. बहुतेक प्रकरणे सौम्य स्वरूपाची असतात, मात्र लहान मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि अशक्त, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना याचा गंभीर धोका असतो. HMPV हा अत्यंत सामान्य विषाणू असून बहुतेक लोकांना पाचव्या वर्षी तो होतो.
मानवी मेटाप्न्युमोव्हायरस म्हणजे काय?
HMPV हा विषाणू सामान्यतः वरच्या श्वसनमार्गांवर परिणाम करतो, पण काहीवेळा तो खालच्या श्वसनमार्गांवरही परिणाम करून न्यूमोनिया, दमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) अधिक तीव्र करू शकतो. हा विषाणू मुख्यतः हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस अधिक प्रमाणात आढळतो. लहान मुलांना HMPV ची लागण होण्याचा जास्त धोका असतो, मात्र पहिल्या संसर्गानंतर तो सौम्य स्वरूपाचा असतो.
HMPV आणि सामान्य सर्दी यामध्ये फरक आहे का?
HMPV प्रामुख्याने सर्दीसारखी लक्षणे निर्माण करतो, पण काही लोकांना हा गंभीर स्वरूपात होऊ शकतो. विशेषतः पहिल्या संसर्गाच्या वेळी हा जास्त तीव्र होतो. लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा धोका अधिक असतो.
मानवी मेटाप्न्युमोव्हायरस किती सामान्य आहे?
संशोधनानुसार, सुमारे १०% ते १२% मुलांच्या श्वसनविकारांमध्ये HMPV कारणीभूत असतो. बहुतेक प्रकरणे सौम्य स्वरूपाची असतात, पण ५% ते १६% मुलांना खालच्या श्वसनमार्गांशी संबंधित विकार होण्याची शक्यता असते.
HMPV आणि RSV एकसारखे आहेत का?
HMPV हा RSV (Respiratory Syncytial Virus) प्रमाणेच Pneumovirus गटाचा एक भाग आहे. त्याची लक्षणे RSV प्रमाणेच असू शकतात, परंतु दोन्ही वेगळे आहेत. HMPV प्रामुख्याने ६ ते १२ महिन्यांच्या मुलांमध्ये गंभीर आजार निर्माण करतो, तर RSV सहा महिन्यांखालील बालकांमध्ये अधिक धोकादायक ठरतो.
मानवी मेटाप्न्युमोव्हायरसची लक्षणे कोणती?
खोकला, ताप, नाक वाहणे किंवा भरलेले नाक, घसा खवखवणे, श्वास घेताना घरघर होणे, श्वास घेताना त्रास होणे, त्वचेवर पुरळ
HMPV कसा पसरतो?
HMPV हा संसर्ग थेट संपर्काद्वारे किंवा दूषित वस्तूंना स्पर्श केल्याने होतो. खोकताना किंवा शिंकताना, हस्तांदोलन मिठी किंवा चुंबनाद्वारे फोन दरवाज्यांचे हँडल्स, कीबोर्ड किंवा खेळण्यांसारख्या वस्तूंना स्पर्श केल्याने होतो.
यावर काय आहेत उपचार?
HMPV साठी सध्या कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच उपचार केले जातात. मात्र, गंभीर रुग्णांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासू शकते.
HMPV च्या सौम्य लक्षणांवरूनच रोग निदान केले जाते. मात्र, गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर श्वासनलिकेचे एक्स-रे किंवा इतर प्रयोगशाळा चाचण्या केल्या जातात. मानवी मेटाप्न्युमोव्हायरस हा सामान्यत: सौम्य स्वरूपाचा असतो, पण काही लोकांसाठी तो गंभीर समस्यांचे कारण ठरू शकतो. त्यामुळे खबरदारी आणि वेळीच योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे


Leave a Reply