मरीन ड्राइव्ह ते वांद्रे प्रवास आता फक्त 12 मिनिटांत; प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईतील प्रवासाला वेग देणारा ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड’ प्रकल्प प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे वांद्रे ते मरीन ड्राइव्ह हा प्रवास अवघ्या १२ मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे मुंबईकरांचा ५० मिनिटांचा वेळ वाचेल आणि वाहतूक कोंडीतूनही मोठा दिलासा मिळेल.

महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात आणि उद्दिष्टे
मुंबई महानगरपालिकेच्या १४,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प २०१८ साली सुरू करण्यात आला होता. १०.५८ किमी लांबीचा कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंत बांधण्यात आला आहे. याला ४.५ किमीचा वांद्रे-वरळी सी लिंक जोडण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.

कोस्टल रोडचा फायदा
१. वेळेची बचत: वांद्रे ते मरीन ड्राइव्ह प्रवासासाठी लागणारा ५० मिनिटांचा कालावधी आता फक्त १२ मिनिटांवर येणार आहे.
२. इंधन बचत: ७०% इंधनाची बचत होणार आहे.
३. वाहतूक कोंडीचा निःशेष: प्रचंड वाहनसंख्या आणि वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
४. प्रदूषण कमी होणार: वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात घट होईल.

कोस्टल रोडची वैशिष्ट्ये
• फुटपाथ आणि सायकल ट्रॅक: प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी फेसदरम्यान ७.५ किमी लांबीचा पदपथ बांधण्यात येणार असून, त्यावर सायकल ट्रॅक उपलब्ध असेल.
• फुलपाखरू उद्यान आणि मैदाने: मार्गावर झोपाळे, घसरगुंडी, मैदाने, आणि फुलपाखरू उद्यान तयार करण्यात येणार आहे.
• भूमिगत पार्किंग: अमर सन्स येथे २५६, महालक्ष्मी मंदिर आणि हाजी अली येथे १,२००, तर वरळी सी फेस येथे ४०० वाहनांसाठी पार्किंगची सोय असेल.
• बोगदे आणि सुरक्षा यंत्रणा: आधुनिक ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग’ तंत्रज्ञानावर आधारित बोगदे तयार करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि वाहनांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याची सुविधा असेल. बोगद्यांना कंट्रोल रूम, स्वयंचलित नियंत्रण, आणि पोलिसांसोबत जोडलेले असेल.
• वेग मर्यादा: मार्गावर वाहनांसाठी ८०-१०० किमी प्रतितास वेगमर्यादा असेल.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *