मंत्री संजय शिरसाट यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरुन खळबळ; पैशांची बॅग की कपडे?

शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या एका कथित व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिरसाट पैशांच्या बॅगा घेऊन बसले असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर, शिरसाट यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते एका मोठ्या बॅगेजवळ बसलेले दिसत आहेत. राऊतांचा दावा खरा ठरल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर, संजय शिरसाट यांनी तातडीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडिओमधील दावा आणि शिरसाटांचे स्पष्टीकरण

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मंत्री संजय शिरसाट एका बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलताना दिसत आहेत. याच बेडखाली एक मोठी बॅग दिसत असून, संजय राऊत यांनी ही बॅग पैशांची असल्याचा आरोप केला होता..या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी हे त्यांचे घर आणि बेडरूम असल्याचे स्पष्ट केले. “तुम्ही पाहत आहात ते माझे घर आहे, माझे बेडरूम आहे,” असे ते म्हणाले. बॅगेबद्दल बोलताना शिरसाट यांनी सांगितले, “या बॅगमध्ये पैसे नाहीत, तर कपडे आहेत. एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का?” यात काहीही गैर नसून, केवळ टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा शिरसाट यांनी केला.

संजय राऊतांवर शिरसाटांचा पलटवार

या प्रकरणावरून संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. राऊत “ठरल्याप्रमाणे भुंकण्याचे” काम करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. “गेलेली सत्ता त्यांना स्वस्थ बसू देत नाही,” असे म्हणत, राऊत ‘मुर्खासारखे’ स्टेटमेंट करत आहेत. “सकाळी उठलं का एकनाथ शिंदे, दुपारी उठलं का एकनाथ शिंदे… एवढंच संजय राऊत यांचं चालू आहे,” असे म्हणत, राऊत सातत्याने  एकनाथ शिंदे यांच्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे शिरसाट म्हणाले.  शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन पक्ष विलीन करण्याची आणि स्वतःला मुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याचा दावा राऊत यांनी केल्याबद्दलही शिरसाट यांनी टीका केली.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *