एमएसआरडीसी वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय

वाढवण-इतगपुरी प्रवास केवळ एका तासात करता येणार आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी वाढवण-इगतपुरी दरम्यान ११८ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाअंतर्गत ८५.३८ किमी लांबीचा चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी एमएसआरडीसीने सोविल कन्स्लटन्सी फर्म या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोकण द्रुतगती महामार्ग प्रकल्पासाठी ही कंपनी सल्लागार म्हणून काम पाहत आहे. याच कंपनीकडून चारोटी-इगतपुरी महामार्गाचा आराखडा तयार केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पास वेग देण्याचे आदेश दिले आहेत. या महामार्गामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्याच्यादृष्टीने एमएसआरडीसी लवकरच एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे.

एमएसआरडीसीने या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सोविल कन्स्लटन्सी फर्म या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या कंपनीकडून लवकरच सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.देशातील सर्वात मोठे बंदर पालघरमधील वाढवण येथे विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला जात असून, या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम शक्य तितक्या लवकर मार्गी लागावे यासाठी एमएसआरडीसीने प्रकल्प अंमलबजावणी व्यवहार्यता अभ्यासाला वेग दिला आहे. आता चारोटी-इगतपुरीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतल्य् माहिती एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी दिली.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *