मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा; या भागात सर्वात खराब हवा

रविवारी शहराचा एकूण एअर क्वालिटी इंडेक्स १४१ नोंदवला गेला, ज्यामध्ये ३० पैकी २४ केंद्रांचा समावेश होता. PM२.५ हा शहरातील प्रमुख प्रदूषक असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई महानगर क्षेत्रातील काही भागांत मध्यम एअर क्वालिटी इंडेक्स नोंदवला गेला, जिथे बहुतेक ठिकाणी PM१० हा मुख्य प्रदूषक होता, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली.
२४ केंद्रांपैकी मालाडने सर्वाधिक २१३ एअर क्वालिटी इंडेक्स नोंदवला, जो खराब श्रेणीत होता. ३ केंद्रांमध्ये समाधानकारक हवा गुणवत्ता आढळली, तर उर्वरित केंद्रांमध्ये ती मध्यम श्रेणीत होती.
हवा प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने अलीकडेच मुंबई महानगर प्रदेश ६ महिन्यांत हरित ऊर्जा स्रोतांकडे वळण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळच्या मते, एअर क्वालिटी इंडेक्स ०-५० दरम्यान चांगला, ५१-१०० समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० खराब, ३०१-४०० अत्यंत खराब, तर ४०० पेक्षा जास्त असल्यास तीव्र प्रदूषण श्रेणीत गणला जातो.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *