आता पुण्यातील या घरात आंतरधर्मीय, आंतरजातीय जोडपे निर्भयपणे राहू शकणार

पुणे : अनेकदा प्रेमविवाह केल्यानंतर विवाहित जोडप्यांना घरच्यांच्या भीतीपोटी वणवण भटकावं लागतं. जर त्यात विवाह अंतरजातीय किंवा आंतरधर्मीय असल्यास परिस्थिती आणखी गंभीर होते. त्यामुळे या जोडप्यांचा विचार करून ‘विचारवेध असोसिएशन’च्या पुढाकाराने आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या युवक युवतीना विवाहानंतर पुण्यात काही काळ सुरक्षित घर ( सेफ हाऊस) सुविधा विनामूल्य उपलब्ध केली असल्याची माहिती असोसिएशनने पत्रकाद्वारे दिली.अधिक माहिती साठी अनिकेत साळवे ८७९६४०५४२९ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.हरियाणा आणि पंजाबमध्ये ऑनर किलिंगच्या अनेक घटना समोर आल्यानंतर स्थानिक सरकारांनी अशी घरे उभारली होती. पंजाब आणि हरियाणामध्ये ऑनर किलिंगच्या घटना वाढल्यानंतर तेथील सरकारने अशी घरे उभारली होती.महाराष्ट्रालाही अशा घरांची गरज आहे. आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उभारलेले हे घर महाराष्ट्रातील पहिले आहे आणि सरकारला स्वतःचे घर उभारण्यासाठी ते मार्गदर्शक ठरले पाहिजे. महाराष्ट्रातही अशे घरे उभारण्याची गरज होती. आता विचारवेध असोसिएशन’ चा पुढाकार घेतला आहे.

आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह संकल्पनेला समाजातून पाठिंबा देण्यासाठी ‘विचारवेध असोसिएशन’ कार्यरत आहे. त्या दृष्टीने काही सुस्थित, प्रतिष्ठित कुटुंबांनी अशा जोडप्यांना विवाहानंतर दोन महिने आधार देण्याची तयारी दाखवली आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने हा आधार विनामूल्य असेल. बाणेर, खडकी, बावधन, औंध, केशवनगर अशा ठिकाणी ही सेफ हाऊस उपलब्ध केली आहेत.’विचारवेध असोसिएशन’च्या पुढाकाराने आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.या उपक्रमांत इच्छुक युवक-युवतींसाठी समुपदेशन व मार्गदर्शन, आर्थिक सहाय्याचे सल्ला, जोडपे एकत्र आणण्यासाठी कार्यक्रम, व्याख्याने तसेच सुरक्षित निवासासाठी ‘सेफ हाऊस’ यांचा समावेश आहे. समाजात आंतरजातीय विवाहाबाबत असलेले गैरसमज दूर करून, विवाह करणाऱ्यांना आधार देण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे.

गृह विभागाचा पुढाकार

आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष म्हणजेच स्पेशल सेल स्थापन करण्याच्या सूचना राज्याच्या गृह विभागाने केल्या आहेत. पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली हा विशेष कक्ष काम करेल.यानुसार स्पेशल सेलसोबतच संबंधित जोडप्यांची सुरक्षा, त्यांच्यासाठी सेफ हाऊस, हेल्पलाईन क्रमांक, आवश्यक असल्यास पोलीस तक्रार आणि सुरक्षा तसेच आढावा घेण्यासाठी समिती आणि अहवाल सादर करणे अशा एकूण 9 सूचना आणि त्यासाठीची कार्यपद्धती यात जारी करण्यात आली आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *