वणी (यवतमाळ) : होळीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे नाव ऐकून तुम्हाला देखील हसू कंट्रोल करता येणार नाही. होळी आणि रंगपंचमीनिमित्त १४ मार्च रोजी ‘महामुर्ख’ नावाचं संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. हे संमेलन, गेल्या ५४ वर्षांपासून भरतं. याची सुरुवात, प्रसिध्द साहित्यिक प्रा राम शेवाळकर यांनी केली होती. हे महामूर्खांचे संमेलन दरवर्षी होळीनिमित्त आयोजित केले जाते म्हणे. शहरातील शेतकरी मंदिर येथे दुपारी अडीच वाजता या ‘महामुर्ख’ संमेलनाला सुरुवात होणार आहे.
शेगाव येथील हास्यकवी नितीन वरणकार, अकोला येथील हास्यकवी प्रो.संजय कावरे, गझलकार गोपाल मापारी, वणी येथील कलाकार राजेश महाकुलकर, प्राचार्य हेमंत चौधरी आणि पुरुषोत्तम गावंडे हे रसिकांचे मनोरंजन करणार आहेत. महामर्ख संमेलनाच्या आयोजनात किरणताई देरकर व संजय खाडे यांचे विशेष सहकार्य लाभले असून श्रोत्यांनी या महामर्ख संमेलनाचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजक मुन्नालाल तुगनायत, शशिकांत माळीचकर, जयचंद खेरा,प्रा.भुमारेडीबो दकुरवार, विलान बोदाडकर, गजानन बोटे यांनी केला आहे.
यात दीडशहाणेही मागे नाहीत
एकीकडे महामुर्ख संमेलन भरवण्यात येत असताना वणी येथील अ.भा अतिशहाणे संमेलन समितीचे लोक देखील मागे नाहीत. त्यांनी देखील अ.भा अतिशहाणे संमेलन समितीच्यावतीने धुलीवंदनाच्या दिवशी हास्य कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. शासकीय मैदान (पाण्याची टॉकी जवळ) वणी येथे आयोजित या कवी संमेलनात शहरातील नागरिकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक दिग्गज सिनेस्टार कवी शहरात येणार आहेत.
मागील 25 वर्षापासून समिती तर्फे “दीड शहाणे कवी संमेलना”चे आयोजन करण्यात येत आहे. त्यात मुंबई येथील हास्य कवी विनोद सोनी, जबलपूर येथील रश्मि किरण, आलसी कवी राजेंदर मालविया, लाफ्टर किंग ज्यु. जॉनी लिवर आणि फिल्म स्टार मुजावर मालेगावी तसेच मंच संचालक किरण जोशी हे कवी श्रोत्यांना खदखदून हसायला लावणार आहेत.
हास्य कवी संमेलनात कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीचे राजु उंबरकर, रवि बेलुरकर, निकेत गुप्ता, राकेश खुराणा, राजाभाऊ पाश्रडकर आशिष खुलसंगे, प्रदिप बोनगिरवार, सुभाष तिवारी, बंटी खुराणा, दिपक छाजेड, तुषार अतकरे, भिकमचंड गोयनका, रमेश तांबे यांनी केले आहे.
Leave a Reply