13 वर्षीय मुलीला मारहाण करून आई-वडिलांनी लावले 2 मुलांच्या बापासोबत बालविवाह

बीड : शहरातील अवघ्या 13 वर्षांच्या पीडिता नुकतीच पाचवी पास झाली. सहावीच्या वर्गात जाण्यासाठी तयार होती. तिला वडील आणि सावत्रआई आहे. आधीच दोन विवाहासह दोन मुलांचा बाप असलेल्या सुलेमान पठाण (25, रा. बेलखंडी पाटोदा, ता. बीड) याच्यासोबत जुळवले. गुरुवारी सकाळी 08 वाजताच शाहूनगर भागातील घरात विवाह लावला. त्याचे फोटोही काढले; परंतु सुलेमानच्या पत्नीने तक्रार केली. याची कुणकुण सुलेमानला लागली. त्यामुळे त्याने आपल्या बहिणीच्या गावच्या आसेफ शेख याला तेथे पाठवले आणि स्वतः पळून गेला. त्या विवाहाचे फोटोही काढले.

या प्रकरणात कोणाला संशय येऊ नये, म्हणून आसेफ हा नवरीला घेऊन जात होता. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांना मिळाली. त्यांनी लगेच पोलिस यंत्रणेशी संपर्क साधून त्यांना बार्शी रोडवर पकडले. सुलेमानला पहिल्या बायकोपासून एक मुलगी आहे. त्यांच्यात वाद झाले असून, न्यायालयात प्रकरण सुरू आहे. याच प्रकरणात त्याला अटक वॉरंट निघाल्याचे पत्नीने सांगितले होते. दुसरी पत्नीही त्याच्या नात्यातील असून, तिला मुलगा आहे. अगोदर दोन बायका असतानाही सुलेमान याने अवघ्या 13 वर्षांच्या मुलीसोबत तिसरा विवाह केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात सुलेमान पठाण आणि आसेफ शेख यांच्यासह मुलीचे व दोन्ही मुलांच्या नातेवाइक असे 22 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अगोदर दोन बायका असतानाही सुलेमान याने अवघ्या 13 वर्षांच्या मुलीसोबत तिसरा विवाह केला. इच्छा नसतानाही आई-वडिलांनी मारहाण करून विवाह लावला असल्याचं बालिकेने सांगितल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

घटनेची माहिती मिळताचं आम्ही महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह मिळालेल्या स्विफ्ट डिजाईरचा पाठलाग करून आरोपीना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. तक्रारीवरून 22 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अशाप्रकारचे बालविवाह जर होत असतील तर तात्काळ पोलिसांना त्याची माहिती द्यावी, असं आवाहन पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.या प्रकरणानंतर अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *