महाराष्ट्रातील १४,४८८ तरुणांना ‘पीएम इंटर्नशिप’; मुंबई-पुणे आघाडीवर

नवी दिल्ली: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील तब्बल १४,४८८ तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळाली आहे. ही इंटर्नशिप मिळवण्यात मुंबई आणि पुण्यातील तरुणांनी बाजी मारली असून, ते राज्यात आघाडीवर आहेत.
कॉर्पोरेट मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील १ लाख २७ हजार ५०८ तरुणांना इंटर्नशिप देण्यात आली आहे. यामध्ये तामिळनाडू १४,५८५ इंटर्नशिपसह देशात पहिल्या क्रमांकावर आहे, तर १४,४८८ इंटर्नशिप्ससह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर गुजरात (११,६९०), कर्नाटक (१०,०२२) आणि उत्तर प्रदेश (९,०२७) यांचा क्रमांक लागतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एक कोटी तरुणांना ८०० मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देण्याची घोषणा केली होती. २०२४-२५ मध्ये १ लाख २५ हजार इंटर्नशिपचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. मात्र, पहिल्या टप्प्यातच १,२७,७०८ तरुणांना इंटर्नशिप प्रदान करण्यात आली. यासाठी देशभरातून ६ लाख २१ हजार अर्ज प्राप्त झाले होते. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्राच्या ३७ जिल्ह्यांतील १४,४८८ तरुणांना ही इंटर्नशिप देण्यात आली आहे.

कोणत्या शहरातील किती इंटर्नशिप्स?

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील इंटर्नशिपची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
* मुंबई: ४,२५७
* पुणे: ४,१९४
* नागपूर: ६६१
* नाशिक: ६६१
* मुंबई उपनगर: ६९८
* छत्रपती संभाजीनगर: ३१०
* ठाणे: २८७
* कोल्हापूर: २३४
* रायगड: ८८
* अहिल्यानगर: २३

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *