दिल्ली उच्च न्यायालयाने प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांच्या विरुद्ध एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. रहमानच्या ‘वीरा राजा वीरा’ गाण्याची रचना उस्ताद फैयाज वसिफुद्दीन डागर आणि त्यांच्या काकांच्या ‘शिव स्तुती’ गाण्याशी जवळजवळ समान आहे. हे गाणे तमिळ चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन २’ (PS2) मध्ये वापरण्यात आले आहे. असे न्यायालयाने ठरवले सांगितले.
न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग यांच्या खंडपीठाने या प्रकरणात रहमान आणि चित्रपट निर्मिती कंपनी मद्रास टॉकीज यांना गाण्याच्या श्रेयांमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले. विशेषतः, डागर कुटुंबाला योग्य मान मान्यता देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. यानुसार, ‘शिव स्तुती’ गाण्याच्या रचनेला डागर कुटुंबाच्या संगीत परंपरेचे श्रेय दिले जाईल.
नासिर जहिरुद्दीन आणि नासिर फैयाजुद्दीन डागर यांना त्यांच्या योगदानासाठी मान्यता दिली जाईल.
न्यायालयाने रहमान आणि निर्मिती कंपनीला ₹2 कोटी खर्च म्हणून न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयात म्हटले आहे की, वादग्रस्त गाणे फक्त ‘शिव स्तुती’ गाण्याच्या रचनेवर आधारित किंवा प्रेरित नाही, तर ते त्याच्याशी पूर्णपणे जुळते, केवळ काही तफावत असली तरी.
न्यायाधीशांनी यावर देखील टिप्पणी केली की, “जेव्हा वादी (डागर) यांनी प्रतिवादी क्रमांक १ शी संपर्क साधला, तेव्हा अनिच्छेने जेमतेम पोचपावती देण्यात आली, .”
न्यायालयाने गाण्याच्या क्रेडिट्समध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात, सर्व ओटीटी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एक नवीन स्लाईड तयार केली जाईल, ज्यामध्ये “दिवंगत उस्ताद एन फैयाजुद्दीन डागर आणि दिवंगत उस्ताद जहिरुद्दीन डागर यांच्या शिव स्तुतीवर आधारित रचना” असे उल्लेख केले जाईल.
पद्मश्री पुरस्कार प्राप्त उस्ताद फैयाज वसिफुद्दीन डागर यांनी यापूर्वी आरोप केला होता की, ‘वीरा राजा वीरा’ गाण्याची रचना त्यांच्या वडिलांनी आणि काकांनी रचलेल्या ‘शिव स्तुती’ गाण्यावरून कॉपी करण्यात आली आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला होता की, गाण्याचे संगीत, लय, आणि ताल मूळ ‘शिव स्तुती’ रचनेच्या जवळपास समान आहेत, आणि त्याचे योग्य श्रेय त्यांना दिले गेलेले नाही.
न्यायमूर्ती सिंह यांनी आपल्या निकालात म्हटले की, “जोपर्यंत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकाराची रचना मूळ असेल, तोपर्यंत कॉपीराइट कायद्याअंतर्गत संरक्षणाचा हक्क असावा.
Leave a Reply