शिवसेना (ठाकरे गट) या मुद्द्यावर आधीपासूनच आवाज उठवत असताना, आता राहुल गांधी देखील यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. आज (गुरुवार, ६ मार्च) ते मुंबईत दाखल होणार असून, धारावीला भेट देऊन तेथील मजुरांशी आणि लघुउद्योजकांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने टीका करताना, अदाणी समूहाला मिळालेल्या उद्योगधंद्यांच्या कंत्राटांवर प्रश्न उपस्थित करत आले आहेत. त्यांचा आरोप आहे की, केंद्र सरकार अदाणी समूहाच्या माध्यमातून देशाची संपत्ती लुटत आहे. अशा परिस्थितीत, धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे कंत्राट अदाणी समूहाला देण्यात आले असल्याने, राहुल गांधींनी राज्यातील महायुती सरकारवर आधीच टीकेची तोफ डागली आहे. महत्त्वाचे म्हणजे, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज्य आणि केंद्र सरकारवरचा विरोधी पक्षांचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राहुल गांधी आक्रमक; आज मुंबई दौरा
•
Please follow and like us:

Leave a Reply