मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा “माणुसकीचा मेघदूत” पुरस्कार २०२४ या वर्षी सामाजिक कार्यकर्ता आणि चांगुलपणाची चळवळचे अध्यक्ष तसेच WE चे सह–संस्थापक श्री. राज देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे. समाजकारणात निस्वार्थीपणे कार्य करताना मानवतेचे मूल्यं जपणाऱ्या आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.
राज देशमुख यांनी गेल्या काही वर्षांत चांगुलपणाची चळवळ उभारून समाजात मानवीतेचं बीज रुजविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला आहे. युवकांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणे, परस्पर सहकार्याची भावना वाढविणे आणि समाजातील विविध वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे या त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात शांततापूर्ण मार्गाने संवाद साधत आंदोलकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. या सर्व क्षेत्रांतील योगदानाची दखल घेत मराठा उद्योजक लॉबीने त्यांना २०२४ चा “माणुसकीचा मेघदूत” पुरस्कार जाहीर केला आहे.
या पुरस्काराचे वितरण २३ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सकाळी ८.०० वाजता होणार आहे. मराठा उद्योजक लॉबीच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठा समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
Dreamland Realty, शिवम ज्वेलर्स आणि Oscar Hospital यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. समाजहितासाठी सदैव तत्पर राहून कार्य करणाऱ्या राज देशमुख यांच्या कार्याची दखल घेतला गेलेला हा सन्मान मराठा समाजातील सकारात्मक उपक्रमांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.


Leave a Reply