भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे भांग पिऊन बोलतात,असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर मनसेकडूनही तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली असून, मनसे नेते अमेय खोपकर यांनी थेट इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले कृपाशंकर सिंग?
राज ठाकरे यांना काही गोष्टी समजायला वेळ लागतो. आज ते काहीतरी बोलतात, उद्या काहीतरी वेगळंच बोलतात. मला वाटतं, ते सकाळी उठून भांग घेत असावेत आणि त्यामुळेच त्यांना आपण काय बोलतोय हे समजत नाही. होळीच्या निमित्ताने त्यांच्यासाठी भांग पाठवण्याचा विचार करतो, असे कृपाशंकर सिंग यांनी राज ठाकरेंवर टीका करताना म्हटले.
कृपाशंकर सिंग यांच्या या वक्तव्यावर मनसे नेते अमेय खोपकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सगळीकडे होळीची धूम आहे, रंगांची उधळण सुरू आहे. लोक आनंद घेत आहेत, तुम्हीही तो घ्या. पण असं गलिच्छ राजकारण कशाला करता? तुमची लायकी नाही राज ठाकरे साहेबांवर टीका करण्याची. जो कोणी राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करेल, त्याच्या कानाखाली आवाज निघेल,असा खणखणीत इशारा त्यांनी दिला आहे. इतकंच नव्हे, तर त्यांनी कृपाशंकर सिंग यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत म्हटले की, महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाहीत. कृपाशंकर सिंग यांना इशारा द्यावा इतपत ते काही मोठे नाहीत. राज ठाकरे साहेब म्हणतात तसं ते फक्त एक फेरीवाले आहेत आज एका पक्षात, तर उद्या दुसऱ्या पक्षात
Leave a Reply