अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विमान अपघातातील जखमींची भेट घेतली. त्यांनी या विमान अपघातातील एकमेव जिवंत प्रवासी रमेश विश्वास कुमार (विश्वाश कुमार रमेश) यांचीही भेट घेतली. विश्वास म्हणाले की मी विमानातून उडी मारली नाही तर सीटसह विमानातून बाहेर पडलो. विमानात २४२ लोक होते, त्यापैकी २४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाने दुपारी १.३८ वाजता उड्डाण केले. उड्डाणानंतर काही सेकंदांनी विमान बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलशी धडकले. अपघातानंतर काही तासांनी, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये रक्ताने माखलेला विश्वास कुमार रुग्णवाहिकेकडे चालत जात असल्याचे दिसून आले.
विश्वास त्याच्या भावासोबत युकेला परतत होते
विश्वाश कुमार रमेश हे ४० वर्षीय ब्रिटिश नागरिक आहे, जे भारतात त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते. ते त्यांचा भाऊ अजय कुमार रमेश (४५) सोबत युकेला परतत होते. विश्वास ११अ सीटवर बसले होते, तर त्यांचे भाऊ विमानात वेगळ्या रांगेत बसले होते.
विश्वास अपघाताबद्दल काय म्हणतात?
विश्वास म्हणाले की, “उड्डाणानंतर तीस सेकंदांनी मोठा आवाज झाला आणि नंतर विमान कोसळले. हे सर्व खूप लवकर घडले. अपघातानंतर जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी पाहिले की माझ्याभोवती मृतदेह होते. मी घाबरलो. मी उभा राहिलो आणि पळत सुटलो. माझ्याभोवती विमानाचे तुकडे होते. कोणीतरी मला पकडले आणि रुग्णवाहिकेत बसवून रुग्णालयात नेले.”
मी कसा वाचलो यावर माझा विश्वासच बसत नाहीये”
विश्वास कुमार अपघाताबद्दल सांगतात, “माझ्या डोळ्यासमोर सर्व काही घडले. मला स्वतःवर विश्वासच बसत नाही की मी जिवंत कसा बाहेर येऊ शकलो. काही काळासाठी मला वाटले की मी मरणार आहे. पण काही काळानंतर जेव्हा मला वाटले की मी वाचलो, तेव्हा मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि माझा सीट बेल्ट काढून बाहेर आलो. माझ्या समोर असलेले काका, काकू आणि एअर होस्टेस सर्वजण मेले होते.” उड्डाणाच्या ५-१० सेकंदातच, सगळं थांबल्यासारखं वाटलं. नंतर विमानाचे हिरवे आणि पांढरे दिवे चालू झाले. विमानाने उड्डाणासाठी वेग वाढवताच, ते एका वसतिगृहाच्या इमारतीवर आदळले”, असं विश्वास सांगतात.
Leave a Reply