रतन टाटांच्या मृत्यूपत्राने खळबळ, मृत्यूपत्रात उलगडला गूढ; ५०० कोटींहून अधिक रक्कम ठेवली ‘मिस्ट्री मॅन’साठी

भारतीय उद्योगसम्राट आणि टाटा उद्योग समूहाचे दिग्गज रतन नवल टाटा यांच्या निधनाला चार महिने पूर्ण झाले आहेत. नुकतेच उघड झालेल्या त्यांच्या इच्छापत्रात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या संपत्तीचा एक तृतीयांश भाग, म्हणजेच ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम, अशा व्यक्तीला दिली आहे ज्याबद्दल जगाला फारशी माहिती नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, रतन टाटांनी त्यांच्या इच्छापत्रात मोहिनी मोहन दत्ता यांना ५०० कोटींपेक्षा जास्त रक्कम दिली आहे. रतन टाटा आणि मोहिनी दत्ता यांच्यातील संबंध जास्त लोकांना माहीत नव्हते, त्यामुळे ही बातमी टाटा कुटुंबासाठीही धक्का देणारी ठरली आहे.

कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता?
जमशेदपूर येथील रहिवासी मोहिनी मोहन दत्ता ट्रॅव्हल क्षेत्रात कार्यरत आहेत. रतन टाटांच्या इच्छापत्रात त्यांनी दिलेल्या रकमेबद्दल ऐकूनच कोणालाही आश्चर्य वाटेल. दत्तांचे कुटुंब ‘स्टॅलियन’ नावाच्या ट्रॅव्हल एजन्सीचे संचालन करतात, जी २०१३ मध्ये ‘ताज सर्व्हिसेस’मध्ये विलीन झाली होती. ‘ताज सर्व्हिसेस’ ही ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचा एक भाग आहे. दत्तांच्या कुटुंबाचा ८०% हिस्सा ‘स्टॅलियन’मध्ये होता, तर उर्वरित २०% टाटा इंडस्ट्रीजकडे होता. मोहिनी दत्ता टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेसच्या संचालिका होत्या, जी थॉमस कुकशी संबंधित होती.

रतन टाटांच्या इच्छापत्रात ‘मिस्ट्री मॅन’ कोण?
रतन टाटांच्या जवळच्या लोकांच्या मते, मोहिनी दत्ता हे त्यांचे जुने मित्र होते आणि दत्ता त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांना ओळखत होते. यावर विचारल्यास, मोहिनी दत्ताने कोणतेही उत्तर दिले नाही. टाटा कुटुंबातील अन्य एक्झिक्युटर्स, शिरीन आणि दीना जीजीभॉय यांनीही यावर काहीही सांगितले नाही, तसेच दुसरे एक्झिक्युटर डेरियस खंबाट्टा आणि चौथे एक्झिक्युटर मेहली मिस्त्री यांनीही यावर काहीही भाष्य केले नाही.

दत्ता यांचे टाटा कुटुंबाशी संबंध
मोहिनी दत्ता यांची दोन मुलींपैकी एकाने २०२४ पर्यंत टाटा ट्रस्टमध्ये नऊ वर्षे सेवा दिली, तर त्याआधी ती ताज हॉटेल्समध्ये कार्यरत होती. दत्ता स्वतःला टाटा कुटुंबाशी जवळचे मानत. २०२४ मध्ये रतन टाटांच्या अंत्यसंस्कारात दत्ता यांनी सांगितले की, त्यांची रटन टाटांशी पहिली भेट जमशेदपूरमधील डीलर्स हॉस्टेलमध्ये झाली होती, तेव्हा रतन टाटा २४ वर्षांचे होते. त्यांनी मला मदत केली आणि मला पुढे नेले, अशी त्यांनी आठवण सांगितली.

रतन टाटांचे इच्छापत्र: एक सामाजिक दान
डिसेंबर २०२४ मध्ये मुंबईतील NCPA येथे रतन टाटांच्या वाढदिवसाच्या समारंभात मोहिनी दत्ता यांना आमंत्रित करण्यात आले होते. रतन टाटा यांनी त्यांच्या बहुतेक संपत्तीचे दान केले, तर काही पैसे त्यांच्या सावत्र बहिणींसाठी राखून ठेवले आहेत. कुटुंबीयांमध्ये याबद्दल चर्चा सुरू आहे, आणि कायदेशीर तज्ञांचा असा विश्वास आहे की संपत्तीचे वितरण एक तपासणी प्रक्रियेतील आहे. रतन टाटांच्या प्रत्यक्ष संपत्तीमध्ये फेरारी, मासेरातीसारख्या लक्झरी कार, महागडी चित्रकला, स्टार्टअप्समधील शेअर्स आणि इतर गुंतवणूकांचा समावेश आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *