महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक; देशात पहिल्या क्रमांकावर

नवी दिल्ली : भारतातील थेट परकीय गुंतवणूकीत गेल्या वर्षाच्या तुलनेत १४ % अधिक वाढ झाली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक झाली असून २०२४-२५ मध्ये देशाच्या एकूण ४०% आणि गेल्या वर्षीपेक्षा ३२% जास्त ही गुंतवणूक आहे. २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीचे (जानेवारी ते मार्च २०२५) आकडे आता जाहीर झाले आहेत. महाराष्ट्राने या संपूर्ण वर्षात १,६४,८७५ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे, जी या वर्षी भारतात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीच्या ४०% आहे. या वर्षी देशात मिळालेली एकूण परकीय गुंतवणूक ४,२१,९२९ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत, महाराष्ट्रात या वर्षी ३२% जास्त परकीय गुंतवणूक झाली आहे.

या शेवटच्या तिमाहीतच महाराष्ट्रात २५,४४१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे. गेल्या दशकात हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले आहे. वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांतच हा विक्रम मोडला गेला आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक (१३ टक्के) व दिल्ली (१२ टक्के) दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये सिंगापूरमधून सर्वात जास्त ३० टक्के आणि त्याखालोखाल मॉरीशस (१७ टक्के) व अमेरिका (११ टक्के) या देशांमधून भारतात गुंतवणूक केली गेली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली. ते म्हणाले, मी महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की माझे सहकारी – उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि उर्वरित मंत्रिमंडळाच्या नेतृत्वाखाली – महाराष्ट्राची गती त्याच मजबूत पद्धतीने सुरू राहील.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात परकीय गुंतवणूक:

२०१५-१६: ₹६१,४८२ कोटी

२०१६-१७: ₹१,३१,९८० कोटी

२०१७-१८: ₹८६,२४४ कोटी

२०१८-१९: ₹५७,१३९ कोटी

एप्रिल ते ऑक्टोबर २०१९: ₹२५,३१६ कोटी

२०२०-२१: ₹१,१९,७३४ कोटी

२०२१-२२: ₹१,१४,९६४ कोटी

२०२२-२३: ₹१,१८,४२२ कोटी

२०२३-२४: ₹१,२५,१०१ कोटी

२०२४-२५: ₹१,६४,८७५ कोटी

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *