मुंबई : मुंबईतील बनावट नकाशाप्रकरणाची एसआयटीची अहवालानुसार जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर कारवाईचे आदेश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहे. शहरातील काही विभागात पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी बांधकामांसाठी दोषींवर कारवाई करण्यात यावी. यासाठी विधी व न्याय विभागाचे साहाय्य घेतले जावे, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. मुंबई महानगरपालिका हद्दीतील विभागांमध्ये पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील जागांचे वापराकरिता बनावट नकाशेचा मुद्दा आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता. त्याबाबत मंत्रालय बैठक पार पडली. संबंधित विभागाने सांगितले की, या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर विशेष तपास पथकामार्फत कारवाई केली जात आहे. या जागांवर बनावट नकाशा आधारे झालेल्या बांधकामांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. या जागांवरील बांधकामे तोडून सदर प्लॉट मोकळे करण्यात येत आहेत. याबरोबरच दोषपूर्ण आढळलेल्या नकाशे आधारित मालमत्तांबाबत न्यायवैद्यक विभागाकडून बनावट नकाशांची तपासणी करणे, दोषपूर्ण प्रकरणात नोटिसा बजावणे, दोषींना अटक करणे, आदि कायदेशीर कारवाई केली जात आहे.
बैठकीमध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयाचे उपयुक्त श्री घुगे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय अधिकारी श्रीमती कापसे यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मुंबईतील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांवरील 102 बनावट नकाशे बाबत विधानपरिषदेत तारांकित प्रश्न 152 द्वारे माहिती विचारण्यात आली होती. सन 2007 -08 मध्ये सदर भूमी अभिलेख विभागातील काहीच्या सहभागाने बनावट नकाशे तयार करण्यात आले होते. मागील काळात न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेत काही जागांवरील नकाशांबाबत स्थगिती मिळविण्यात आली होती. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासन विधी व न्याय विभागाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. बैठकीस मार्गदर्शन करताना, सदर कारवाई दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये परंतु कोणतीही दोषी व्यक्तिना सोडू नये, अशा सूचना देखील महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या.
Leave a Reply