मुंबई : उत्तरप्रदेशच्या संभल येथे होळी आणि रमजान महिन्याचा शुक्रवार एकत्र आल्याने वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहेत. संभलच्या अनेक मशिदिंवर ताडपत्री टाकण्यात आले आहेत. अशात समाजवादी पक्षाचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सण सर्वांनी मिळून साजरा करायला पाहिजे धार्मिक उत्सवावर राजकारण करू नये, असे विधान केले आहे.
याआधी मुघल बादशाह औरंगजेबबद्दल केलेल्या विधानामुळे अबू आझमी वादात अडकले होते. त्यांनी औरंगजेबची प्रशंसा केली होती. त्याच्या विधानावर सर्वत्र संताप व्यक्त केला गेला. इतकंच नाही तर अधिवेशनातुन त्यांना निलंबित करत त्यांच्यावर गुन्हा देखील करण्यात आला. त्यानंतर आता त्यांची मवाळ भाषा समोर आली आहे. त्यांनी संभल येथे होळीनिमित्त मशिदीवर ताडपत्री झाकण्यात आली यावर प्रतिक्रिया देताना गंगा-जमुना संस्कृतीची आठवण करून दिली. इतकंच नाही तर त्यांनी धार्मिक सनांवर राजकारण होऊ नये, असं देखील सांगून टाकले.
काय म्हणाले अबू आझमी?
समाजवादी पक्षाचे (सपा) आमदार अबू आझमी यांनी होळीच्या वेळी संभलसह उत्तर प्रदेशातील अनेक मशिदींना ताडपत्रीने झाकण्याबाबत विधान केले आहे. ते म्हणाले की, ”काही खोडकर लोक खोडसाळपणा करतात. आपल्या देशात गंगा-जमुना संस्कृती आहे. सणांवर राजकारण करू नये. सर्वांनी त्यांचे सण एकत्र साजरे करावेत”. अबू आझमी म्हणाले की, उद्या होळी साजरी करणाऱ्यांना मी विनंती करेन की त्यांनी जाणूनबुजून कोणत्याही मुस्लिमांवर रंग उधळू नये. त्यांनी सांगितले की, जर काही सक्ती असेल तर घरी नमाज अदा करता येईल परंतु शुक्रवारची नमाज मशिदीत अदा करणे आवश्यक आहे. अबू आझमी म्हणाले की, जरी एखाद्या मुस्लिम बांधवाला रंग चढला तरी त्याने वाद घालू नये तर क्षमा करावं. कारण हा महिना (रमजान) उपासनेचा आहे, असं आझमी म्हणाले.
Leave a Reply