संभाजीराजे छत्रपतींना सरळ उचलून त्यांच्यावर मोक्का लावावा”; प्रकाश आंबेडकरांच्या मागणीने खळबळ

मुंबई : वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या वादावर बोलतानावंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर मोक्का लावून त्यांना तुरुंगात टाकावे, अशी खळबळजनक मागणी केली आहे. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प 31 मे पर्यंत हटवण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्या या मागणीच्या विरोधात धनगर समाजातील काही नेते पुढे आले होते. त्यामुळे हा वाद चिघडतो की काय, असं वाटत असताना प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

वृत्तवाहिनी न्यूज 18 लोकमत’ सोबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, संभाजी महाराजांना सरळ उचलून मोक्का लावावा. देशाच्या कायद्याच्या विरोधात भुमिका घेण्याऱ्यांचे लांगूलचालन करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुख्य देवेंद्र फडणवीस यांनी ही हिंमत दाखवावी,असे आवाहन त्यांनी केले. राज्याने राज्य केले पाहिजे. धर्माचे राजकारण करताना जे सोईचे ते वापरतात. संभाजीराजे छ्त्रपती हे राजर्षी शाहूंचे पणतू आहेत त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही असे नाहीं.उद्या मी सुद्धा कायदा विरोधी कृत्य केले तर मला ही तुरंगात टाकले पाहिजे, असे सांगताना आता ही हिंमत देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी, अशीमागणी त्यांनी केली.

संभाजीराजेंची मागणी काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वाघ्या कुत्र्याचे शिल्प 31 मे पर्यंत रायगडावरून हटवावे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती. ते म्हणाले शिवप्रेमींचा देखील याला विरोध असून वाघ्या श्वानाची समाधी शिवप्रेमींनी एकदा हटवली होती, मात्र प्रशासनाने पुन्हा तो पुतळा बसवला असून त्याला पोलीस संरक्षण देण्यात आल्याचे म्हटले आहे. वाघ्या श्वानाची समाधी अलीकडच्या काळात बांधण्यात आली असून ते रायगडवरील अतिक्रमण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षहून आधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्याची समाधी संरचनेस 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना 31 मे पूर्वी हटविणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *