आळंदी— श्री क्षेत्र फळा , ता. पाळम, जि. परभणी येथील श्री संत मोतीराम महाराज संस्थान, शाखा आळंदी यांच्या वतीने आयोजित कार्तिकी वारीनिमित्त “संत पुरस्कार वितरण सोहळा” यावर्षी भव्य उत्साहात पार पडणार आहे. हा सोहळा शनिवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. श्री लोकनाथ चैतन्य महाराज , महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक संचालक महेश म्हात्रे , मुंबईचे उपधर्मदाय आयुक्त राहुल चव्हाण, निवृत्त लेफ्टनंट कर्नल सुनील तांदळे, सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे, राजेंद्र उमाप, जगद्गुरू श्री तुकोबाराय विश्व कल्याण मिशनचे संस्थापक ह.भ.प डॉ. चेतनानंद महाराज तसेच निवृत्त सहायक पोलिस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर हे उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करणाऱ्या संतांचा “संत पुरस्कार” देवून गौरव करण्यात येणार आहे.
पुरस्कारप्राप्त संतांचा यामध्ये समावेश आहे —
संत ज्ञानेश्वर महाराज पुरस्कार- ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख
संत नामदेव महाराज पुरस्कार – ह.भ.प धर्मचार्य शंकर महाराज शेवाळे,
संत एकनाथ महाराज पुरस्कार – ह.भ.प प्रशांत महाराज मोरे
संत तुकाराम महाराज पुरस्कार – ह.भ.प. विशाल महाराज खोले
संत जनाबाई महाराज पुरस्कार – ह.भ.प. गयाबाई महाराज यादव
संत गोरोबाकाका महाराज पुरस्कार – ह.भ.प. जलाल महाराज सय्यद
संत चोखामेळा महाराज पुरस्कार – ह.भ.प. प्रल्हादबुवा पांचाळ
संत सावता महाराज पुरस्कार – ह.भ.प. महंत महामंडलेश्वर काशिनाथदासजी महाराज
संत नरहरी महाराज पुरस्कार – ह.भ.प. लक्ष्मण महाराज खरात
संत सेना महाराज पुरस्कार – ह.भ.प. श्रीकांत महाराज दुराफे
संत मोतीराम महाराज पुरस्कार – ह.भ.प. माधव महाराज केंद्रे माळाकोळीकर
कार्यक्रमाचे आयोजन श्री संत मोतीराम महाराज संस्थान, शाखा आळंदी येथे करण्यात आले असून, विविध धार्मिक व सामाजिक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.


Leave a Reply