आर्थिक अनिश्चिततेच्या सावटाखाली, अमेरिकेच्या वाढलेल्या आयात करांचा प्रभाव लक्षात घेता देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बुधवारी सलग दुसऱ्यांदा व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली. या निर्णयामुळे सर्वसामान्य कर्जधारकांना हप्त्यांचा भार थोडा हलका वाटू लागणार आहे.
घरखरेदी, वाहन विक्री आणि इतर ग्राहक वस्तूंमध्ये मागणी वाढेल, या आशेने उद्योगविश्वानेही या पावलाचं स्वागत केलं. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाची घोषणा होताच काही तासांतच बँक ऑफ इंडिया आणि यूको बँकेनेही आपले कर्ज व्याजदर पाव टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली.
सोमवारपासून सुरू असलेल्या पतधोरण समितीच्या बैठकीचा निर्णय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी जाहीर केला. समितीतील सहाही सदस्यांनी एकमताने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करत तो आता ६ टक्क्यांवर आणला आहे. फेब्रुवारीनंतरची ही सलग दुसरी कपात असून, सामान्य जनतेसाठी हा मोठा दिलासा ठरत आहे.
Leave a Reply