नव्वदच्या दशकातील राजकीय, सामाजिक घडामोडींनी भारलेला
तो काळ विलक्षण वेगवान होता. धावपळीचा होता. दैनिक मुंबई सकाळमध्ये दणदणीत बातम्या देण्याची एकच चढाओढ सुरू असे. तेव्हाच, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश एम एल पेंडसे, ज्येष्ठ संपादक माधव गडकरी
आणि सात नामवंत आमदार यांच्या विरोधात मी गुजरातच्या न्यायालयातून चक्क बलात्काराच्या केसमध्ये अटक वॉरंट “विकत आणले” होते.
माझ्या त्या बातमीने इंग्लिश वृत्तपत्रात देखील खळबळ उडवून दिली होती… त्याच सुमारास, मला महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ता मधून ऑफर आल्या होत्या. त्या संदर्भात मी जेव्हा ज्येष्ठ पत्रकार आणि मार्गदर्शक दिलीप चावरे साहेबांशी बोललो. तेव्हा ते म्हणाले, “थांब घाई करू नकोस… आपण प्रदीप वर्मा यांना भेटू ”
त्याकाळात साप्ताहिक लोकप्रभा म्हणजे, प्रदीप वर्मा हे अद्वैत होतं.
मुख्य म्हणजे, साप्ताहिक लोकप्रभा हे, राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारे प्रकाशन असल्याने त्यात प्रसिद्ध होणार्या लेखांचा ‘इम्पॅक्ट’ जोरदार असे…
पुढील दोन चार दिवसात मी, चावरे साहेबांच्या सोबत एक्सप्रेस टॉवर्स मधील लोकप्रभा’मध्ये गेलो… आणि ९ फेब्रुवारी १९९५ रोजी माझे, बातमीदारीचे काम सुरू सुद्धा झाले…
प्रदीप वर्मा, ज्यांना सगळे “वर्मा जी” म्हणुन संबोधित असत, ते संपादक, सोबत, ख्यातनाम लेखिका- पत्रकार संजीवनी खेर, प्रतिभावान लेखक अभिजीत देसाई, चित्रकार- पत्रकार सतीश नाईक, नावीन्याचा ध्यास घेतलेला, हरहुन्नरी पराग पाटील, डोळ्यात मोठी स्वप्नं आणि मनगटात ‘कोल्हापुरी’ दम असणारा संदीप माळवी, ज्येष्ठ पत्रकार जयश्री देसाई, अशी ताकदवान संपादकीय टीम होती. त्यामुळे कामाला मजा येत असे.
स्वत: वर्मा जी, राष्ट्रीय विषयांवर लिहायचे आणि माझ्यासारख्या तुलनेने नवख्या आणि तरुण पत्रकारावर, त्यांनी राज्यातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर लिहायची जबाबदारी टाकली. त्यांनी दाखविलेल्या या विश्वासामुळे माझ्या पत्रकारितेला पैलू पडले. त्यांनी दिलेल्या आधाराने कुणालाही भिडण्याची हिम्मत वाढली. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील, नितीन गडकरी अशा अनेक नामवंत नेत्यांसोबत महाराष्ट्र पाहता आला, समजून घेता आला.
‘सकाळ’मध्ये राधाकृष्ण नार्वेकर साहेब आणि ‘लोकप्रभा’मध्ये वर्मा जी, यांच्यासारखे, कायम पाठीशी उभे राहणारे संपादक लाभल्याने, माझ्या पत्रकारितेचा पाया भक्कम झाला…
आज मागे वळून पाहताना, ते मंतरलेले दिवस आठवतात. आमच्या लोकप्रभाच्या छोट्याशा टीममधील अखंड चालणारी गप्पासत्रे, एकत्र फिरणे, जेवणे, आणि कामाचा फडशा पाडणे… सगळं, अपूर्व आनंददायी , समृद्ध करणारे असे.
त्यामुळे, जानेवारी २००१ मध्ये, लोकप्रभा सोडताना मला थेट संपादक पदाची ऑफर आली आणि पुढे त्याच श्रेणीत काम करण्याचा मान मिळाला… त्यासाठी, प्रदीप वर्मा जी, समस्त लोकप्रभा टीम, चित्रकार भारत वद्देवार, संदेश पाटील, संजय चोचे, भिडे साहेब, कुमुदिनी मॅडम, महेंद्र तांदळेकर, या सर्व सहकार्यांनी दिलेले प्रेम, सहकार्य आयुष्यभर विसरणे शक्य नाही.
आज, अजातशत्रू वर्मा जी, यांच्या वाढदिवसानिमित्त ही आठवणींची सुवर्ण पाने उलटली गेली आणि डोळे सहज पाणावले…
धन्यवाद टीम लोकप्रभा…
धन्यवाद.. वर्मा जी…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !नव्वदच्या दशकातील राजकीय, सामाजिक घडामोडींनी भारलेला
तो काळ विलक्षण वेगवान होता. धावपळीचा होता. दैनिक मुंबई सकाळमध्ये दणदणीत बातम्या देण्याची एकच चढाओढ सुरू असे. तेव्हाच, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश एम एल पेंडसे, ज्येष्ठ संपादक माधव गडकरी
आणि सात नामवंत आमदार यांच्या विरोधात मी गुजरातच्या न्यायालयातून चक्क बलात्काराच्या केसमध्ये अटक वॉरंट “विकत आणले” होते.
माझ्या त्या बातमीने इंग्लिश वृत्तपत्रात देखील खळबळ उडवून दिली होती… त्याच सुमारास, मला महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ता मधून ऑफर आल्या होत्या. त्या संदर्भात मी जेव्हा ज्येष्ठ पत्रकार आणि मार्गदर्शक दिलीप चावरे साहेबांशी बोललो. तेव्हा ते म्हणाले, “थांब घाई करू नकोस… आपण प्रदीप वर्मा यांना भेटू ”
त्याकाळात साप्ताहिक लोकप्रभा म्हणजे, प्रदीप वर्मा हे अद्वैत होतं.
मुख्य म्हणजे, साप्ताहिक लोकप्रभा हे, राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारे प्रकाशन असल्याने त्यात प्रसिद्ध होणार्या लेखांचा ‘इम्पॅक्ट’ जोरदार असे… खासकरुन संजय राऊत यांच्या “सच्चाई” साठी आम्ही तरुण पत्रकार लोकप्रभा अंकाची वाट पहात असायचो.
पुढील दोन चार दिवसात मी, चावरे साहेबांच्या सोबत एक्सप्रेस टॉवर्स मधील लोकप्रभा’मध्ये गेलो… आणि ९ फेब्रुवारी १९९५ रोजी माझे, बातमीदारीचे काम सुरू सुद्धा झाले…
प्रदीप वर्मा, ज्यांना सगळे “वर्मा जी” म्हणुन संबोधित असत, ते संपादक, सोबत, ख्यातनाम लेखिका- पत्रकार संजीवनी खेर, प्रतिभावान लेखक अभिजीत देसाई, चित्रकार- पत्रकार सतीश नाईक, नावीन्याचा ध्यास घेतलेला, हरहुन्नरी पराग पाटील, डोळ्यात मोठी स्वप्नं आणि मनगटात ‘कोल्हापुरी’ दम असणारा संदीप माळवी, ज्येष्ठ पत्रकार जयश्री देसाई, अशी ताकदवान संपादकीय टीम होती. त्यामुळे कामाला मजा येत असे.
स्वत: वर्मा जी, राष्ट्रीय विषयांवर लिहायचे आणि माझ्यासारख्या तुलनेने नवख्या आणि तरुण पत्रकारावर, त्यांनी राज्यातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर लिहायची जबाबदारी टाकली. त्यांनी दाखविलेल्या या विश्वासामुळे माझ्या पत्रकारितेला पैलू पडले. त्यांनी दिलेल्या आधाराने कुणालाही भिडण्याची हिम्मत वाढली. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील, नितीन गडकरी अशा अनेक नामवंत नेत्यांसोबत महाराष्ट्र पाहता आला, समजून घेता आला.
‘सकाळ’मध्ये राधाकृष्ण नार्वेकर साहेब आणि ‘लोकप्रभा’मध्ये वर्मा जी, यांच्यासारखे, कायम पाठीशी उभे राहणारे संपादक लाभल्याने, माझ्या पत्रकारितेचा पाया भक्कम झाला…
आज मागे वळून पाहताना, ते मंतरलेले दिवस आठवतात. आमच्या लोकप्रभाच्या छोट्याशा टीममधील अखंड चालणारी गप्पासत्रे, एकत्र फिरणे, जेवणे, आणि कामाचा फडशा पाडणे… सगळं, अपूर्व आनंददायी , समृद्ध करणारे असे.
त्यामुळे, जानेवारी २००१ मध्ये, लोकप्रभा सोडताना मला थेट संपादक पदाची ऑफर आली आणि पुढे त्याच श्रेणीत काम करण्याचा मान मिळाला… त्यासाठी, प्रदीप वर्मा जी, समस्त लोकप्रभा टीम, चित्रकार भारत वद्देवार, संदेश पाटील, संजय चोचे, भिडे साहेब, कुमुदिनी मॅडम, महेंद्र तांदळेकर, या सर्व सहकार्यांनी दिलेले प्रेम, सहकार्य आयुष्यभर विसरणे शक्य नाही.
आज, अजातशत्रू वर्मा जी, यांच्या वाढदिवसानिमित्त ही आठवणींची सुवर्ण पाने उलटली गेली आणि डोळे सहज पाणावले…
धन्यवाद टीम लोकप्रभा…
धन्यवाद.. वर्मा जी…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
महेश म्हात्रे
संपादक- संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Leave a Reply