परवडणाऱ्या घरांची टंचाई, आलिशान घरांचा साठा मात्र वाढला; पहिल्या तिमाहीचा अनारॉक अहवाल जाहीर

देशातील सात प्रमुख महानगरांमध्ये परवडणाऱ्या घरांची मागणी वाढत असली, तरी त्यांच्या पुरवठ्यात मात्र मोठी घट झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यंदाच्या २०२५ च्या पहिल्या तिमाहीत विक्री न झालेल्या परवडणाऱ्या घरांचा साठा तब्बल १९ टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याउलट, आलिशान घरांचा साठा २४ टक्क्यांनी वाढला असून हाय-एंड घरांकडे ग्राहकांचा कल वाढल्याचं सूचित होत आहे.

अनारॉक ग्रुपच्या अहवालात धक्कादायक वास्तव

अनारॉक ग्रुपने देशातील सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकता यांचा समावेश आहे. या अहवालानुसार, कोविड संकटानंतर परवडणाऱ्या घरांना मागणी कमी झाली. या घरांची विक्री कमी झाल्याने त्यांचा पुरवठाही कमी झाला. यंदा पहिल्या तिमाहीत परवडणाऱ्या घरांचा (किंमत ४० लाख रुपयांपेक्षा कमी) साठा १ लाख १३ हजारांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १ लाख ४० हजार होता. यंदा त्यात १९ टक्क्यांची घट झाली आहे. यंदा पहिल्या तिमाहीत विक्री न झालेल्या आलिशान घरांचा (किंमत १.५ कोटी रुपयांपेक्षा कमी) साठा १ लाख १३ हजार आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ९१ हजार १२५ होता. त्यात यंदा २४ टक्के वाढ नोंदविण्यात आली.

 

शहरानुसार परवडणाऱ्या घरांचा बदल

• बंगळुरूत परवडणाऱ्या घरांचा साठा सर्वाधिक – ५१ टक्क्यांनी घटला.

• चेन्नईत ४४ टक्क्यांची घट.

• पुणेत २८ टक्के घट, तर दिल्लीत २२ टक्के घट झाली.

• मुंबईत साठा ११ टक्क्यांनी कमी झाला आहे.

• कोलकतात २० टक्क्यांची घट नोंदवली गेली.

• याउलट, हैदराबादमध्ये मात्र ९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

 

दिल्ली, मुंबई, कोलकता, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये आलिशान घरांचा साठा वाढताना दिसतोय. मात्र चेन्नई आणि पुण्यात या घरांच्या साठ्यात अनुक्रमे ४ व ११ टक्क्यांची घसरण झाली आहे.

४० ते ८० लाख रुपये किंमतीच्या घरांचा साठा देखील घटला आहे. यंदा पहिल्या तिमाहीत हा साठा १.५८ लाखांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच वेळी १.७५ लाख होता – म्हणजेच १० टक्क्यांची घट.

सर्व प्रकारच्या विक्री न झालेल्या घरांचा एकूण साठा यंदा ५.६० लाखांवर आला आहे, जो मागच्या वर्षी ५.८१ लाख होता म्हणजेच एकूण ४ टक्क्यांची घट.

 

परवडणारी घरे (किंमत ४० लाखांपेक्षा कमी)

 

महानगर – पहिली तिमाही २०२५ – पहिली तिमाही २०२४ – बदल (टक्क्यांमध्ये)

मुंबई : ५३,९४२ : ६०,७८३ : – ११

पुणे : १४,६८६ : २०,५२२ : – २८

दिल्ली : २५,१०५ : ३२,१८९ : – २२

बंगळुरू : ३,३२३ : ६,७३६ : – ५१

हैदराबाद : १,८१५ : १,६६० : ९

चेन्नई : १,०९० : १,९४६ : – ४४

कोलकता : १२,७८३ : १६,०६९ : – २०

एकूण : १,१२,७४४ : १,३९,९०५

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *