गिरगाव येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला १२६ वर्ष पूर्ण झाली आहे.
“श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ”, अशा अखंड स्वामिनामस्मरणाचा सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. १९ एप्रिल २०२५, सकाळी ठीक ६ वाजता सप्ताहला सुरुवात होणार आहे. तर सांगता शनिवार दि २६ एप्रिल २०२५ रोजी होईल. रोज दिवसाचे चोवीस तास अखंड पारायण चालू असणार आहे.या कालावधी मध्ये श्री स्वामी चरणी येण्यास सस्नेह निमंत्रण करीत आहे, असे आवाहन अक्कलकोट स्वामी समर्थ मठ – गिरगाव यांच्याकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रम पुढील प्रमाणे
●७६ वा अखंड नामस्मरण सप्ताह
●अखंड नामस्मरण सप्ताह
●अखंड श्री गुरुचरित्र पारायण
●श्री स्वामी कृपामृत पारायण
श्रींची पालखी मिरवणूक रविवारी 27 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता निघेल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
शनिवार दि. २६एप्रिल २० २५ – चैत्रकृ. त्रोदशी (श्रींचा पुण्यस्मरण दिन)
◆सकाळी ०६.०० वाजता – अखंड नामस्मरण ◆सप्ताह व श्री गुरु चरित्र पारायणाची सांगता
◆सकाळी ०८.३० वाजत- आरती
◆सकाळी १०.०० वाजता – लघुरुद्र
◆दुपारी २.०० वाजता- मंत्रजागर
◆सायंकाळी ०४ते५.२० वाजता – सुश्राव्य किर्तन
◆सायंकाळी ०७.४५ वाजता – आरती व मत्पुष्पांजली
◆रात्री- ०९ ते ११ वाजता- स्वामीभक्तांची गायन सेवा
(सर्व गायकांना मुक्त प्रवेश-आगाऊ नोंदणी करणे आवश्यक) कार्यक्रमानंतर शेजारती
Leave a Reply