‘स्नेहवन’ : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी आशेचं किरण

पुणे : आयटीची गलेलठ्ठ पगार असलेली नोकरी सोडून अशोक देशमाने यांनी उभं केलेलं ‘स्नेहवन’ ठरतंय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि आई किंवा वडील नसलेल्या मुला-मुलींसाठी आशेचा किरण. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे 2015 साली परभणीच्या अशोक देशमाने यांनी हे स्नेहवन प्रकल्प सुरू केले होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, आर्थिक परिस्थिती नसललेल्या आई किंवा वडील नसलेले मुले यांना चांगलं शिक्षण, व्यावहारिक ज्ञान आणि व्यावसायिक शिक्षण मिळावं यासाठी हे प्रकल्प उभं करण्यात आलं आहे. 18 मुलांपासून सुरू केलेले हे स्नेहवन प्रकल्प आज 200 मुलांसाठी मायेची सावली बनलं आहे. मागील 10 वर्षात अनेक मुलं इथून शिकून आपल्या पायावर उभे राहिले आहेत.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय?

अशोक देशमाने हे मूळचे परभणी जिल्ह्याचे. आयटीची शिक्षण घेऊन त्यांनी चांगल्या कंपनीत चांगली पगार असलेली नोकरी मिळवली. मात्र सुरुवातीपासूनचं त्यांना समाजकार्याची आवड होती. कंपनीत जॉब करत आर्थिक क्षमता नसलेल्या मुलांना ते शिकवायला जात. 2012 ते 2015 सालादरम्यान मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडलं. त्याचा परिणाम शेतकरी आणि गरीब कुटुंबावर झाला. अनेकांना गाव सोडावं लागलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत गेली. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अशोक देशमाने यांना सतावत होता. त्यांच्यासाठी काहीतरी करावं यासाठी त्यांनी आपल्या पगारातून उरणाऱ्या पैशातून या मुलांना शिकवायचे असा निर्धार केला. आळंदीत त्यांनी सुरवातीला 10×10 च्या दोन खोलीत 18 मुलांसह स्नेहवन सुरू झाले. सुरवातीच्या काळात रात्रपाळी करत जॉब आणि स्नेहवन सांभाळणं अवघड झालं होतं. 9 महिने तसेच काढत शेवटी वयाच्या 25 व्या वर्षी आयटीची नोकरी सोडून पूर्णवेळ स्नेहवनला द्यायचं असं ठरवलं.

नोकरी सोडून पूर्णवेळ स्नेहवनसाठी

नोकरी सोडून पूर्णवेळ स्नेहवनच्या मुलांसाठी द्यायला अशोक यांनी सुरुवात केली.नंतर त्यांना साथ मिळाली त्यांच्या पत्नी अर्चना यांची. मुलांची आई बनत अर्चना यांनी स्नेहवन परिवाराचा संभाळ करण्यात कुठलीही कसर ठेवली नाही. त्यांची ही मेहनत पाहून पुण्यातील डॉक्टर रवींद्र आणि डॉ. स्मिता कुलकर्णी यांनी आळंदीजवळील आपली 2 एकर जागा स्नेहवनला दिली. आज 200 मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी स्नेहवन आकार घेत आहे. स्नेहनवमधील 70 आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी, शेतमजूर, यांची 130 मुलं असे 200 मुलं स्नेहवनच्या सावलीत आयुष्याचं शिक्षण घेत आहेत. अवघ्या 10 वर्षात स्नेहवनचा पसारा चांगलाच वाढला आहे.

मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर

मुलांना निवारा देणे आणि खाऊपिऊ घालणे हा स्नेहवन सुरू करण्यामागचा त्यांचा उद्देश नव्हता, हे कायमच लक्षात ठेऊन येथे आलेल्यांच्या शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या निकोप वाढीकरता शक्य तितके सारे प्रयत्न केले जातात. शालेय शिक्षण तर मुले घेतातच, पण याबरोबरच मुलांना व्यावहारिक ज्ञान देण्याचा,
जीवनावश्यक कला शिकण्याचा आणि प्रत्येक विद्यार्थीला अंगभूत गुणांना जोपासता येतील, याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. त्यांना इंग्रजी संवादकौशल्य, शाळेनंतर योग शिक्षण, संगणक प्रशिक्षण, खाद्यपदार्थ बनवणे, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती याचेही धडे दिले जातात. अकरावी-बारावीची मुले कोडिंग शिकत आहेत. तब्बल १२ हजार पुस्तकाचे सुसज्ज ग्रंथालय येथे आहे त्याची व्यवस्था एक मुलगाच पाहतो. २० संगणकांच्या लॅबचे व्यवस्थापनही एक विद्यार्थीच करतो. उभारलेल्या सौर प्रकल्पाची जबाबदारीही मुलेच सांभाळतात.

अत्याधुनिक शेतीचे ज्ञान

आत्महत्याग्रस्त डोतकऱ्यांच्या मुलांना अत्याधुनक हायड्रोपोनिक शोतीचे ज्ञान व्हावे, यासाठी नवीन पॉलिहाऊस उभारले आहे. या पॉलिहाऊस मध्ये मुलांना वर्टीकल फार्मिंग, हायड्रोपोनिक आणि
मशरूम शोतीच्या अत्याधुनिक शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्लोथ वॉशिंग अँड ड्राइंग सेंटरच्या माध्यमातून मुलांना कपडे धुण्याच्या व्यवसायाची ओळख करून देण्यात येत आहे. 30
किलो कपडे एकाच वेळी धुणे आणि वाळवणे याचे प्रशिक्षण मुलांना देण्यात येईल. तसेच स्नेहवन संस्थेतील दैनंदिन गरजेसाठी या मशीनचा वापर करण्यात येईल. केस कर्तनालय व ब्युटी पार्लर
संकल्पनेच्या माध्यमातून मुलांना हेअर कटिंग सलूनचे अत्याधुनिक शिक्षण तसेच ब्युटी पार्लरचे अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी ही लॅब उभारली आहे. तसेच टूव्हीलर व फोर व्हीलर गॅरेज प्रशिक्षण
केंद्रही उभे केले आहे.

 

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *