मुंबई: राज्यात नोंदणी झालेल्या ७ लाख ६४ हजार ७३१ शेतकऱ्यांपैकी ३ लाख ६९ हजार ११४ शेतकऱ्यांकडून ७ लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली असून ही खरेदी इतर राज्याच्या तुलनेने सर्वाधिक आहे. देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यांना मागे टाकत देशांमध्ये सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्राने केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. याबाबत माध्यमांशी बोलताना मंत्री रावल म्हणाले, अनेक जिल्ह्यांनी आपले खरेदी उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला अडचण येऊ नये यासाठी वेगाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया करण्याची तसेच दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पोहोचेल या संदर्भात वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत खरेदी चालू राहणार असल्याने सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. तथापि, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची गरज भासल्यास केंद्र सरकारकडे मुदत वाढवून मागीतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री रावल म्हणाले, राज्यात नाफेड व एनसीसीएफ अंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सीच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरू आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दि. १ ऑक्टोबर २०२४ पासून नोंदणी सुरू केली होती. त्यानुसार दि.१५ ऑक्टोबर २०२४ पासून राज्यातील ५६२ खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सूरू करण्यात आली आहे. नोंदणी करता येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीची मुदत एक वेळा वाढवली. त्यानंतर सुरुवातीला सोयाबीन खरेदीची मुदत १२ जानेवारी २०२५ पर्यंत होती, मात्र या मुदतीत अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी न झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांना विनंती करून खरेदीची मुदत दि. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवली आहे.
महाराष्ट्र खरेदीत अव्वल
मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात खरेदीच्या तुलनेत महाराष्ट्राने आतापर्यंत सर्वाधिक खरेदी केली आहे. या सहा राज्यांची एकूण खरेदी १८ लाख ६८ हजार ९१४ मेट्रिक टन इतकी झाली असून महाराष्ट्राने ७ लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन खरेदी केली आहे. राज्यात नांदेड जिल्ह्यात ५७ हजार ५२८ शेतकऱ्यांकडून १ लाख २९० मेट्रिक टन इतकी सर्वाधिक सोयाबीन खरेदी झाली आहे. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात २९ हजार ७६४ शेतकऱ्यांकडून ६० हजार ९८९ मेट्रिक टन खरेदी झाली आहे. सुरुवातीच्या काळात आलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून आजही वेगाने खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. केंद्र सरकारने सन २०२४-२५ करीता सोयाबिनसाठी प्रति क्विंटल ४ चार ८९२ रुपये इतका हमीभाव घोषित केला असून त्यानुसार खरेदी सुरू आहे. हे दर मागील वर्षाच्या हमीभावापेक्षा २९२ रुपये प्रति क्विंटल इतके जास्त आहे. सन २०२४-२५ मध्ये लागवडीखालील क्षेत्र ५०.५१ लाख हेक्टर असून उत्पादन ७३.२७ लाख मेट्रिक टन अपेक्षित आहे. पीएसएस खरेदीसाठी केंद्र सरकारने १४ लाख १३ हजार २७० मे.टन (१९.२८ टक्के) मंजूरी दिली असल्याची माहितीही मंत्री रावल यांनी दिली आहे.
* केंद्र सरकारने सन २०२४-२५ करीता सोयाबिनसाठी प्रति क्विंटल ४ चार ८९२ रुपये इतका हमीभाव घोषित केला असून त्यानुसार खरेदी सुरू आहे. हे दर मागील वर्षाच्या हमीभावापेक्षा २९२ रुपये प्रति क्विंटल इतके जास्त आहे. सन २०२४-२५ मध्ये लागवडीखालील क्षेत्र ५०.५१ लाख हेक्टर असून उत्पादन ७३.२७ लाख मेट्रिक टन अपेक्षित आहे. पीएसएस खरेदीसाठी केंद्र सरकारने १४ लाख १३ हजार २७० मे.टन (१९.२८ टक्के) मंजूरी दिली असल्याची माहितीही मंत्री रावल यांनी दिली आहे.
राज्यातील सोयाबीन खरेदीच्या संदर्भात ठळक मुद्दे :
❖ मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या प्रमुख पाच सोयाबीन उत्पादक राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राने सर्वाधिक सोयाबीन खरेदी केली आहे.
❖ अजून गरज भासल्यास केंद्र सरकारला सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची विनंती करणार.
❖ राज्यात नोंदणी झालेल्या एकूण ७ लाख ६४ हजार ७३१ शेतकऱ्यांपैकी २५ जानेवारी २०२५ पर्यंत ३ लाख ६९ हजार ११४ शेतकऱ्यांकडून ७ लाख ८१ हजार ४४७ मेट्रीक टन सोयाबीन खरेदी करण्यात आली.
❖ नाफेड व एनसीसीएफ यांच्या अंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सी च्या माध्यमातून दिनांक १ ऑक्टोबर २०२४ पासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली होती, त्यानुसार ७ लाख ६४ हजार ६३१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
❖ मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात खरेदीच्या तुलनेत महाराष्ट्राने सर्वाधिक खरेदी केली आहे. महाराष्ट्रासह या सहा राज्यांची एकूण खरेदी १८ लाख ६८ हजार ९१४ मेट्रिक टन इतकी झाली असून त्यापैकी ७ लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन खरेदी महाराष्ट्राने केली आहे.
❖ दि. १५ ऑक्टोबर २०२४ पासून राज्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सूरू करण्यात आली आहे. या खरेदीसाठी नाफेड आणि एनसीसीएफ च्या अंतर्गत नोडल एजन्सी कडून राज्यात ५६२ केंद्रांवर खरेदी वेगाने सुरू आहे.
❖ सोयाबीन खरेदीची मुदत दि. १२ जानेवारी २०२५ रोजी संपलेली होती, मात्र लोकप्रतिनिधी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना विनंती करून ही मुदत दि. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवली आहे.
❖ केंद्र शासनाने सन २०२४-२५ करीता सोयाबिनसाठी प्रति क्विंटल ४ हजार ८९२ इतका हमीभाव घोषित केला आहे. या वर्षाचे दर हे मागील वर्षाच्या हमी भावापेक्षा रू २९२ रुपये प्रति क्विंटल इतके जास्त आहेत.
❖ राज्यात सर्वाधिक सोयाबीन खरेदी नांदेड जिल्ह्यात झाली असून ५७ हजार ५२८ शेतकऱ्यांकडून १ लाख २९० मेट्रिक टन इतकी खरेदी झाली आहे. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील २९ हजार ७६४ शेतकऱ्यांकडून ६० हजार ९८९ मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली आहे.
❖ ३१ जानेवारी २०२५ पर्यंत खरेदी सुरू राहणार आहे, त्यामुळे खरेदीचा आकडा अजून वाढेल. दरम्यान सोयाबीन खरेदीची आणखी गरज भासल्यास केंद्राकडून मुदत वाढवून देण्याची विनंती करणार आहे.
❖ सन २०२४-२५ मध्ये लागवडीखालील क्षेत्र ५०.५१ लाख हेक्टर व उत्पादन ७३.२७ लाख मेट्रिक टन अपेक्षित आहे.
❖ सुरुवातीला सोयाबीन खरेदीत येणाऱ्या बारदान उपलब्धता व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. त्यात खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करा व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खरेदी प्रक्रिया वेगाने करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या, त्यामुळे खरेदीचे उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो.
❖ खरेदीनंतर बँकिंग प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन ते तीन दिवसात रक्कम जमा करण्यासाठी जलद गतीने कारवाईच्या सूचना नाफेड आणि यंत्रणेला दिल्या. त्यानुसार लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट जमा झाले.
Leave a Reply