राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम देत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळली आहे. “मी विठुरायाच्या चरणी महाराष्ट्राच्या चांगल्या दिवसांची प्रार्थना केली, पण अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावी, अशी कोणतीही मागणी केली नाही, कारण तशी गरजच नाही, असं सूचक वक्तव्य तटकरे यांनी केलं.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालीच काम करणार
पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तटकरे म्हणाले,अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यरत आहोत आणि पुढेही राहू.
कर्जत येथे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर पाहून एकत्रीकरणाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र त्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरेंनी दिलेल्या स्पष्ट विधानामुळे या चर्चांना थेट फेटाळ देण्यात आला आहे.रायगडच्या पालकमंत्री पदाविषयी विचारले असता, तटकरे यांनी त्यावर थेट उत्तर न देता, मी सात्त्विक माणूस आहे,असे म्हणत प्रश्न टाळला.
Leave a Reply