Tag: BJP
-
भाजपची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ‘तवा फॉर्म्युला’ तयार: प्रत्येक आमदाराला पाच कामांचे प्राधान्य
•
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातून पाच प्रमुख कामे सुचवावीत, अशी सूचना पक्षाकडून करण्यात आली आहे. ही कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे. उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवडाभरात राज्यभरातील भाजप आमदारांसोबत स्वतंत्र बैठका…
-
भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष, १ जुलैला रवींद्र चव्हाण यांच्या नावाची होणार अधिकृत घोषणा
•
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड घडणार आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री आणि विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड होणार असून, या पदासाठी केंद्रीय भाजपने केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. किरण रिजिजू हे ३० जून रोजी मुंबईत दाखल होतील आणि १ जुलै रोजी एका समारंभात…
-
ठाकरे सेनेचे सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये दणदणीत प्रवेश; भाजपवर टीकेची झोड
•
मुंबई: ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख राहिलेले सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी (१७ जून २०२५ रोजी) दुपारी भव्य शक्तिप्रदर्शन करत भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृतपणे प्रवेश केला. हा प्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे, कारण भाजपनेच पूर्वी बडगुजर यांच्यावर देशद्रोहाचे गंभीर आरोप करत त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली होती. बडगुजर यांच्या…
-
शरद पवारांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या आशा मावळल्या: भाजपसोबत गेलेल्यांवर सडकून टीका
•
पिंपरी-चिंचवड : “सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे,” अशी चर्चा असली तरी “सगळे म्हणजे कोण?” असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात भाजपसोबत गेलेल्यांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यता पूर्णपणे मावळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पवार…
-
उद्धव ठाकरेंच्या ‘सामना’तून पीएम मोदी आणि भाजपवर हल्लाबोल
•
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. आता राजकीय पक्षांमध्ये याच विषयावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. शिवसेना-यूबीटीने त्यांच्या सामना वृत्तपत्राच्या संपादकीयमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर मोठा हल्लाबोल केला आहे. सामनाने आपल्या संपादकीयात…
-
शरद पवार गटाला पाटणमधून मोठा धक्का; हा नेता भाजपच्या वाटेवर
•
सातारा : जिल्ह्यातील पाटणमध्ये शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षाचे पाटण येथील महत्वाचे नेते आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. सत्यजीत पाटणकर हे गेल्या काही वर्षांपासून…
-
स्था.स्व.सं निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर?; फडणवीसांनी क्लियर केलं
•
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांबाबत, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने चार आठवड्यांच्या आत निवडणूक अधिसूचना जारी करावी आणि चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे की या निवडणुका कधी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर…
-
भाजप मंत्र्याची कर्नल सोफिया कुरेशीबद्दल आक्षेपार्ह विधान; विरोधक आक्रमक
•
कर्नल सोफियावरील अपमानास्पद टिप्पणीवर काँग्रेस प्रवक्ते अब्बास हाफिज म्हणाले, मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे.
-
राज्यातील भाजपच्या 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर; पाहा कुठल्या जिल्ह्यात कुणाची नियुक्ती
•
मुंबई : भाजपची बहुप्रतिक्षित 58 जिल्हाध्यक्ष यांची यादी जाहीर झाली आहे. एकूण 78 पैकी 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित 20 वादातील नियुक्ती वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. या जाहीर झालेल्या यादीत बहुतांश विद्यमान जिल्हाध्यक्षांना कायम ठेवण्यात आले असून. काही ठिकाणी आमदार किंवा खासदार यांनाच संधी देण्यात आली आहे.…
-
जातीय जनगणना करण्याच्या निर्णयावर काय म्हणाले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान?
•
दिल्ली : केंद्र सरकारने देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, हा निर्णय अचानक घेतलेला नाही, गेल्या ११ वर्षांपासून त्यावर काम सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटकाला लाभ…