Tag: Corona
-

कोरोना लस आणि हृदयविकाराचा संबंध नाही: ICMR आणि एम्सच्या अभ्यासात निष्कर्ष
•
नवी दिल्ली: कोरोना लसीकरणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, अशा अफवा आणि दाव्यांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) केलेल्या एका महत्त्वपूर्ण अभ्यासाने पूर्णविराम दिला आहे. या अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की, कोरोना लसीकरण आणि हृदयविकाराने होणारे मृत्यू यांचा कोणताही थेट संबंध नाही. केंद्र सरकारने बुधवारी…
-

देशात कोरोनाचा पुन्हा वाढता आलेख: सक्रिय रुग्णसंख्या 7 हजारांवर, 74 मृत्यू
•
नवी दिल्ली: देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (COVID-19) विषाणूच्या सक्रिय रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 7 हजारच्या पुढे गेली आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. ही वाढ प्रामुख्याने काही राज्यांमध्ये अधिक दिसून येत असून, यात महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि…
-

देशात कोरोना रुग्णाची संख्या वाढली; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
•
मुंबई : भारतात कोरोना या महाभयंकर रोगाने पुन्हा तोंड वर काढले आहे. दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढत्या क्रमात पाहायला मिळत आहे. देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200 वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता वाढली असून प्रशासन सतर्क झालं आहे. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 325 रुग्ण आहेत.…
-

ठाण्यात मागील 24 तासात 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळले; चिंता वाढली
•
ठाणे : कोरोना या महाभयंकर रोगाने पुन्हा तोंड वर करायला सुरुवात केली आहे. राज्यात बधितांची संख्या वरच्यावर वाढत चालली आहे. एकट्या ठाण्यात मागील 24 तासात 11 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे चिंता वाढली आहे. या 11 बाधित रुग्णांपैकी एकावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात, तर उर्वरित सहा जणांवर खासगी…
-

ठाण्यात कोरोनामुळे 21वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रशासन अलर्ट मोडवर
•
ठाणे : महाराष्ट्राला धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ठाण्यातील कळवा रुग्णालयात 21 वर्षीय तरुणाचा कोरोना प्रादुर्भावाने मृत्यू झाला आहे. मुंब्रा येथे राहणाऱ्या या 21 वर्षीय तरुणाचा सकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला आहे. 22 मे 2025 रोजी साठी उपचारासाठी त्याला कळवा रुग्णालयात…
-

देशातील ११ राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव, महाराष्ट्राला सर्वाधिक धोका
•
मुंबई : देशात कोरोना विषाणूच्या या नवीन प्रकारामुळे आतापर्यंत २५७ लोक बाधित झाले आहेत आणि देशाची राजधानी दिल्लीसह ११ राज्ये प्रभावित झाली आहेत. यामुळे आरोग्य संस्था पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की आतापर्यंतच्या नवीन कोरोना स्ट्रेनची संसर्गजन्यता दर्शवते की ती कोविड-१९ च्या पहिल्या आणि दुसऱ्या उत्परिवर्तनांइतकी…
